Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पुणे येथील प्रमुख पुलांची माहिती महानगरपालिकेने तीन मासांत शासनाला सादर करावी ! - मुख्यमंत्री

विधानसभा प्रश्‍नोत्तरे...
    नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - पुणे शहरातील प्रमुख पुलांची मुदत संपली अथवा कसे याची माहिती येत्या ३ मासांत राज्य शासनाला कळवण्याचे निर्देश पुणे महानगरपालिकेला देण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी १३ डिसेंबर या दिवशी विधानसभेत प्रश्‍नोत्तरात दिली. पुणे शहरातील प्रमुख १८ पुलांच्या झालेल्या दुरवस्थेविषयी सदस्य प्रा. सौ. मेधा कुलकर्णी यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. पुणे महानगरपालिकेच्या परिसरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेने केले असून या अहवालानुसार कोणताही पूल धोकादायक नसल्याचे नमूद करण्यात आले आहे; मात्र बहुतांश पुलांची दुरुस्ती करण्याविषयी सुचवण्यात आले आहे. १० पुलांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.
जात पंचायतीने वाळीत टाकल्याविषयी १० आरोपींना अटक ! - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर
     अहमदनगर जिल्ह्यातील तिरमली नंदीवाले समाजातील कुटुंबांना जात पंचायतीने वाळीत टाकल्याविषयी संबंधितांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात १० आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचे अन्वेषण चालू आहे, अशी माहिती गृहग्रामीण राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली. हा प्रश्‍न सदस्य श्री. अनिल गोटे यांनी विधानसभेत विचारला होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn