Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवी मुंबई येथील मंदिरांवरील कारवाई रोखण्यासाठी नवी मुंबई मंदिर समितीचे भाजपच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे यांना निवेदन

मंदिरांवरील कारवाईच्या विरोधात कृती करणार्‍या नवी मुंबई मंदिर समितीचे अभिनंदन !
      नवी मुंबई, ५ डिसेंबर - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याची मोहीम नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासन यांच्या वतीने हाती घेण्यात आली आहे; मात्र त्यात अन्य धर्मियांच्या स्थळांवर कारवाई न करता केवळ केवळ हिंदूंची मंदिरे पाडण्याचा सपाटा प्रशासनाने चालू केला आहे. आतापर्यंत या परिसरातील ३-४ मंदिरे अनधिकृत ठरवून पाडण्यात आली. प्रशासनाकडून चालवलेली ही एकतर्फी कारवाई थांबवावी. ज्या मंदिरांचा विकासकामात अडथळा येत नाही, अशा मंदिरांची सूची घोषित करून त्या मंदिरांना अधिकृत करण्यात यावी, अशी मागणी नवी मुंबई मंदिर समितीच्या वतीने भाजपच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हिंदूंच्या श्रद्धेच्या या प्रश्‍नाकडे तातडीने लक्ष घालावे, अशी विनंतीही त्यात करण्यात आली आहे.       
निवेदनात पुढे म्हटले आहे की,...
  • विकासकामात अथडळा ठरणार्‍या मंदिरांसाठी पर्यायी भूखंड उपलब्ध करून देण्यात यावा.
  • हिंदूंना आपल्या धर्माची उपासना करण्यासाठी प्रत्येक गावात आणि नोडमध्ये मंदिर बांधून देणे, हे प्रशासनाचे काम आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने हिंदूंनी श्रद्धेपोटी लोकसहभागातून बांधलेल्या या पुरातन मंदिरांशी लोकांचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. अशा मंदिरांना नष्ट करणे म्हणजे हिंदूंचे श्रद्धास्थान आणि समाजमन यांवर केलेला मोठा आघात आहे.
  • यापुढे असा भावनिक पेच निर्माण होऊ नये, यासाठी अनधिकृत मंदिरे उभी रहाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
धर्मरक्षणासाठी कृतीशील विहिंपचे अभिनंदन !
विहिंपचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकर यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांना निवेदन !
  • विश्‍व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. शंकर गायकर यांनीही वरीलप्रमाणे मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
  • मंदिरांवरील कारवाईविषयी आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली. या वेळी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंदिरांवरील कारवाईचा विषय मांडू, असे आश्‍वासन आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी दिले.धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn