Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

साधकाने अनुभवलेली प.पू. पांडे महाराज यांची प्रीती आणि त्यांच्याप्रती व्यक्त केलेली पत्ररूपी कृतज्ञता !

श्री. सागर निंबाळकर
      ज्ञानसागरस्वरूप साधकवत्सल प.पू. पांडे महाराज (प.पू. बाबा) यांच्या चरणी, शिरसाष्टांग नमस्कार आणि कोटी कोटी कृतज्ञता !
      प.पू. बाबा, आपल्याला भेटून वर्ष होत आले; पण बाळ जसे आईपासून कितीही दूर गेले, तरी आईची आठवण त्याला अखंड असते, तसेच मी अनुभवत आहे. त्यामुळे ‘आपल्यापासून मी दूर गेलो आहे’, असे मला मुळीच वाटत नाही. 
१. प.पू. पांडे महाराज यांच्या 
सत्संंगातील अनमोल ज्ञानकण स्मरणात असणे
     प्रत्येक लिखाण करतांना मला आपल्या सत्संंगातील अनमोल ज्ञानकण आठवतात. खंडणाच्या लिखाणाच्या वेळी आपण दिलेली उदाहरणे, शिकवलेली ज्ञानजिज्ञासा, आपण कृतीतून शिकवलेली तळमळ सारं काही संचितासारखे पाठीशी उभे असते.
२. ‘संतांनी जवळ घ्यावे’, ही इच्छा प.पू. डॉक्टरांनी प.पू. पांडे महाराज यांच्या 
माध्यमातून पूर्ण करणे आणि त्यांनी केलेली माया, कौतुक अन् प्रीती आठवून भावजागृती होणे
      यापूर्वी सदगुरु (सौ.) बिंंदाताई, सदगुरु (कु.) अनुताई यांची काही साधिकांसह छायाचित्रे पहायचो, तेव्हा मला वाटायचे, ‘संत मला असे कधी जवळ घेतील का ?’ पण प.पू. डॉक्टरांनी आपल्या माध्यमातून ती सगळी कसर भरून काढली ! माझ्या साधनेच्या अत्यंत कठीण काळात आपणच मायेने माझ्या पाठीवरून हात फिरवलात. मला माऊलीच्या मायेने जवळ केले. पाठीवर आणि गालावर थाप देऊन आमच्या नकळत आध्यात्मिक उपाय केलेत. कौतुकाने गालगुच्चे घेतले. (आता वयाच्या पस्तिशीनंतर आमच्यासाठी असे कुणीतरी केले असते का ?) आपल्या आठवणीने अनेकदा माझी भावजागृती झाली. जेव्हा जेव्हा हे अनुभवायला यायचे, त्यानंतर १ - २ दिवसांत ‘तिकडे आपण माझी आठवण काढली होती’, असा निरोप एखादा साधक द्यायचा. 
३. प.पू. पांडे महाराज यांच्या आशीर्वादानेच 
प.पू. डॉक्टरांची कृपा संपादन करत असल्याचे जाणवणे
     गेल्या वर्षभरात काही मोजक्या प्रसंगांत आपली तीव्रतेने उणीव भासायची; पण त्याच वेळी अकस्मात् सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांचे दर्शन व्हायचे. तेव्हा आपण उभयतांमधील एकरूपता आणखी मनावर बिंबायची. या वर्षभरात प.पू. डॉक्टरांच्या प्रीतीची अनुभूती मोठ्या प्रमाणात अनुभवता आली. आपल्या आशीर्वादानेच त्यांची कृपा संपादन करत असल्याचे अनेकदा जाणवते. 
४. प.पू. पांडे महाराज यांनी वर्णिलेली प.पू. डॉक्टरांची महती वाचून 
‘आपल्या उभयतांच्या मानाने आमचे विचार किती निम्न स्तराचे आहेत’, याची जाणीव होणे
     आपण प.पू. डॉक्टरांविषयी केलेले लिखाण वाचून ‘आपण माझ्याशेजारी बसून ते सांगत आहात’, असे वाटते. ‘त्यांच्याविषयी बोलतांना आणि मार्गदर्शन करतांना आपल्या डोळ्यांतील भावाश्रू माझीही भावजागृती करत आहेत’, असे वाटते. आपण वर्णिलेली त्यांची महती वाचून ‘आपल्या उभयतांच्या मानाने आमचे विचार किती निम्न स्तराचे आहेत’, याची जाणीव होते. तेव्हा मनाला उत्साह लाभतो आणि ‘शरीर थकले’, असे वाटत असूनही सेवा करावीशी वाटते.
५. प्रार्थना
     प.पू. बाबा, अधिक लिहून आपला वेळ घेत नाही. वर्षभरात केवळ एकच कृतज्ञतापत्र लिहीत असल्याविषयी क्षमस्व ! ती. सौ. पांडेआजींना दंडवत. आपल्याविषयी केवळ २ पानेच लिहिणे शक्य नाही; पण गुरुमाऊलीच्या एका रूपाच्या चरणी नतमस्तक मात्र होऊ शकतो. आपली अखंड कृपादृष्टी आम्हा सर्व साधकांवर राहू दे आणि आम्हा सर्वांना आपल्याप्रमाणे प.पू. डॉक्टरांना जिंकता येऊ दे, ही आपल्या चरणी प्रार्थना ! 
- श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.८.२०१६) 
(‘हे पत्र ती. सौ. पांडेआजी यांचे देहावसान होण्यापूर्वी लिहिलेले असल्याने ‘ती. सौ. पांडेआजींना दंडवत’ असा उल्लेख पत्रात आहे.’ - संकलक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn