Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राज्यातील आतंकवादविरोधी पथकातील अधिकार्‍यांना उर्दू, अरबी आणि बांगला भाषांचे धडे !

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आणि  महत्त्वपूर्ण निर्णय
घेण्यास विलंब का लागला, हेही पोलीस महासंचालकांनी स्पष्ट करावे !
     मुंबई, ६ डिसेंबर - महाराष्ट्र पोलिसांकडून आतंकवादविरोधी पथकातील अधिकार्‍यांना उर्दू, अरबी आणि बांगला या भाषांचे शिक्षण देणार्‍या कार्यशाळा चालू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
ते पुढे म्हणाले...

  • सामाजिक संकेतस्थळे आणि अन्य मार्गांनी गुप्त माहिती गोळा करणार्‍या निवडक अधिकार्‍यांना या भाषा शिकवल्या जात आहेत.
  • आम्ही अज्ञात ठिकाणी या कार्यशाळा चालू केल्या आहेत. भारतात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी स्थलांतरित येतात. यापैकी अनेकजण समाजविरोधी कारवायांमध्ये सहभागी असतात. त्यांचे संभाषण आम्हाला कळत नाही. यापूर्वीही अधिकार्‍यांना उर्दू आणि अरबी भाषा शिकवली जात होती; मात्र जुलै मासात बांगलादेशमध्ये इसिसने केलेल्या आतंकवादी आक्रमणानंतर आम्ही अधिकार्‍यांना बांगला ही भाषा शिकवण्याचाही निर्णय घेतला आहे.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn