Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दैनिक सनातन प्रभात म्हणजे अज्ञानाच्या अंधःकारात चाचपडणार्‍या हिंदु समाजाला ज्ञानाचा प्रकाश देऊन नवचैतन्याने प्रेरित करणारा ज्ञानसूर्य !

श्री. संदीप जगताप
        आज समाजमनामध्ये राष्ट्र आणि धर्म यांच्या निष्ठेच्या उणिवा प्रकर्षाने जाणवत आहेत. दूरचित्रवाहिन्या अन् वर्तमानपत्रे यांनी त्या उणिवा दूर होण्यासाठी मोठे कार्य हाती घेऊन लोकशाहीचा खर्‍या अर्थाने चौथा आधारस्तंभ होण्याची आज आवश्यकता आहे. हे करतांना समाजमनाला त्याच्या कर्तव्याची आणि सर्वत्रच्या सत्य परिस्थितीची जाण निर्माण करून योग्य दिशादर्शन करायला हवे. दैनिक सनातन प्रभात हे कार्य समर्थपणे पार पाडत आहे. याच्या तुलनेत इतर मोठमोठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या या त्यांच्या कर्तव्याला पाठ फिरवत असल्याचे लक्षात येत आहे. या कर्तव्याला पाठ फिरवणारी अन्य वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या तुलनेत सनातन प्रभातची वैशिष्ट्ये पुढील सारणीवरून आपल्या लक्षात येतील.
१. अन्य वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या अन् सनातन प्रभात 
२. सनातन प्रभातला होणारा विरोध म्हणजे
राज्यकर्ते आणि प्रशासनाची राक्षसी वृत्तीच असणे
      अनेक वर्षांपासून सनातन प्रभातची समाजमनामध्ये राष्ट्र आणि धर्माची चेतना निर्माण करण्याची यशस्वी घोडदौड चालू आहे. खरे पहाता समाजामध्ये धर्म आणि राष्ट्र यांचा अभिमान निर्माण करून समाजाला कर्तव्याची जाणीव करून देणे, हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे; परंतु असे होतांना दिसत नाही. सर्वत्रच्या राज्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यावे की, जनता कर भरते तो केवळ दौरे काढणे, आश्‍वासने देणे इत्यादी कामांसाठी नव्हे. आर्थिक हानी सोसून हे समाजजागृतीचे कार्य करत असतांना सनातन प्रभातला होणारा विरोध म्हणजे राज्यकर्ते आणि प्रशासन यांची राक्षसी वृत्तीच !
३. प्रत्येकाने संजीवनीप्रमाणे ठरणार्‍या सनातन
प्रभातचा वाचक होऊन या ज्ञानसूर्याचा लाभ करून घ्यावा !
     सनातन प्रभातला ईश्‍वरी अधिष्ठान असल्यामुळे या विरोधावर मात करून हा ज्ञानसूर्य अधिक तेजाने तळपत आहे. तो सूर्य झाकण्याचा या धर्म आणि राष्ट्रद्रोही काजव्यांनी विचारही न करणेच योग्य राहील. सनातन प्रभात हा खर्‍या अर्थाने आपणास वास्तवाची जाणीव करून देणारा आणि आपला साहाय्यक आहे. अन्य वृत्तपत्रांतील आणि वृत्तवाहिन्यांमधील विज्ञापनांमुळे मुलांवर वाममार्गाने जाण्यास प्रवृत्त करणारे संस्कार होत आहेत, ते सनातन प्रभातने कटाक्षाने टाळले आहे. सनातन प्रभातच्या वाचनाला प्रारंभ केला की, अशा अनेक वैशिष्ट्यांची उकल होत जाते. असा हा ज्ञानसूर्य प्रत्येक हिंदु बांधवाच्या दारी आला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने संजीवनीप्रमाणे ठरणार्‍या सनातन प्रभातचा वाचक होऊन या ज्ञानसूर्याचा लाभ करून घ्यावा.
४. राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रतीचे विचार समाजापर्यंत पोचवण्याचे
एक प्रभावी माध्यम दिल्यामुळे दैनिक सनातन प्रभातप्रती कृतज्ञता
     दैनिक सनातन प्रभातप्रती आम्ही अनंत कोटी कृतज्ञ आहोत; कारण त्याने आमच्या मनातील अंधार दूर करून राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रती जाणिवेची बिजे तर रोवलीच, त्याचबरोबर आमच्या मनातील राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रतीचे विचार समाजापर्यंत पोचवण्याचे एक प्रभावी माध्यम दिले; जे अन्य कोणत्या वृत्तपत्राने देण्याची शक्यता अत्यल्पच आहे.
- श्री. संदीप जगताप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn