Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गड आणि किल्ले यांचे दायित्व शिवभक्तांच्या हाती सोपवावे ! - श्री. नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

तुर्भे (नवी मुंबई) येथे आमच्या कृतीत हवेत शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान ! 
    नवी मुंबई, १५ डिसेंबर (वार्ता.) - रायगडावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील तलवार तोडण्यात आली. शिवभक्तांनी काही तरुणांना रायगडावर मद्यपान करतांना पकडले. या सर्व घटनांमुळे रायगड किल्ल्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सरकार आणि पुरातत्व विभाग संरक्षण करू शकत नसेल, तर गड आणि किल्ले यांचे दायित्व शिवभक्तांच्या हाती सोपवावे, असे विचार हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे यांनी व्यक्त केले. तुर्भे येथे श्री शिवछत्रपती बॉईज, मराठा मित्र मंडळ, श्री साई बॉईज यांच्या वतीने आमच्या कृतीत हवेत शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. १४० धर्माभिमान्यांनी याचा लाभ घेतला.
     श्री. सुर्वे पुढे म्हणाले, अफझलखानवधाचा सत्य इतिहास पाठ्यपुस्तकातून वगळून महाराज आणि अफझलखान यांच्या गळाभेटीचे चित्र दाखवण्यात आले आहे. काही हिंदुविरोधकांकडून छत्रपती शिवाजी महाराज निधर्मी होते, असा खोटा प्रचार करण्यात येत आहे. महाराजांनी नेताजी पालकर यांची घरवापसी करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात घेतले होते, तसेच गायींना कापणार्‍या कसायाचे हात छाटले होते. हिंदूंच्या मंदिरांवर कारवाई करणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांना हात लावण्यासही धजावत नाही. प्रत्येकाने स्वत:ची जात, संप्रदाय यांपेक्षा हिंदु म्हणून धर्माला प्राधान्य द्यायला हवे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn