Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथे ईदच्या मिरवणुकीत पोलीस बंदोबस्तात धर्मांधांकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देऊन धिंगाणा !

धर्मांधांकडून उघडपणे राष्ट्रद्रोही कृत्ये होत असतांना त्यावर कोणतीही
कारवाई न करणारे अकार्यक्षम पोलीस हवेच कशाला ? अशा पोलिसांना
निलंबित करा ! हिंदु राष्ट्रात सक्षम पोलीस यंत्रणा असेल !
  • महिलांची छेड काढण्याचे प्रकार 
  •  वाहनांवरून हुल्लडबाजी करून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न
     अंबरनाथ - ईदनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या २५० पैकी १५० दुचाकीस्वार धर्मांधांनी मिरवणुकीतून बाहेर पडून शहरातील प्रत्येक चौकात जाऊन पाकिस्तान जिंदाबाद आणि इस्लाम जिंदाबादच्या घोषणा दिल्या अन् शहरभर हुल्लडबाजी केली, त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. भवानी चौकात धर्मांधांनी रस्त्यावरून जाणार्‍या महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केला. (या ठिकाणी आझाद मैदान मोर्च्याप्रमाणे महिला आणि पोलीस यांच्यावर अत्याचार होण्याच्या घटना घडल्या असत्या, तर त्याला कोण उत्तरदायी झाले असते ? त्यामुळे धर्मांधांच्या मिरवणुकांना अनुमती द्यायची का, याचा पुनर्विचार व्हायला हवा ! - संपादक)      रात्री १० वाजता भवानी चौकात काही धर्मांध हुल्लडबाजी करत अब लग रहा है ना पाकिस्तान ? असे नागरिकांना विचारून दहशत पसरवत होते. (गेली अनेक वर्षे प्रत्येक शहरात मुसलमानबहुल परिसर निर्माण होऊ दिल्याचाच हा परिणाम आहे !- संपादक)      विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तात हा प्रकार चालू होता. पोलिसांसमोर हे सर्व प्रकार होत असूनही या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा प्रविष्ट झालेला नाही. शहरातील सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाची पाहणी करून संबंधितांवर गुन्हा प्रविष्ट करण्याची प्रक्रिया चालू करण्यात येणार आहे, असे समजते.
१. ईदनिमित्त प्रतिवर्षी येथील नवीन भेंडीपाडा परिसरातून मिरवणूक काढून ती शहरातून कोहेरगावातील दर्ग्याजवळ आणण्यात येते.
२. चोख पोलीस बंदोबस्तात सायंकाळी ७ वाजता २५० पैकी १५० धर्मांधांनी मिरवणुकीतून बाहेर पडून कल्याण-बदलापूर महामार्गावर विम्को नाका ते अंबरनाथ पोलीस ठाणे या मधील रस्त्यावर अतीवेगाने दुचाकी चालवली आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत संपूर्ण शहरभर धिंगाणा घातला.
३. विम्को नाका चौक, नगरपालिका चौक, अंबरनाथ पश्‍चिम भागातील स्टेशन चौक, मटका चौक, हुतात्मा चौक, शिवाजी चौक, वेल्फेअर चौक आणि स्वामी समर्थ चौक या ठिकाणी धर्मांधांनी हुल्लडबाजी करून राष्ट्रद्रोही घोषणा दिल्या.
४. काही धर्मांध शहरातील अंतर्गत रस्त्यावरही भटकत होते. धर्मांधांनी दुचाकींचा सायलेन्सर काढून ते चालवत होते. त्यामुळे दुचाकीच्या पुंगळीतून मोठा आवाज होत होता आणि दहशत निर्माण केली जात होती.
५. भवानी चौक, वांद्रापाडा, कोहोजगांव, नवीन भेंडीपाडा येथेही धर्मांध अतीवेगाने दुचाकी चालवून इतर वाहनचालकांना अडथळा निर्माण करत होते. हा सर्व प्रकार अंबरनाथ नगरपालिकेच्या सीसीटीव्हीमध्ये, तसेच स्टेशन परिसरातील व्यापार्‍यांच्या कॅमेर्‍यातही याचे चित्रीकरण झाले आहे. भवानी चौकात धर्मांधांना काही स्थानिकांनी विरोध केल्यावर या धर्मांधांनी पळ काढला. (हिंदूंच्या प्रभावी संघटनाचा लाभ ! - संपादक) ६. ईदच्या मिरवणुकीचे परीक्षण करण्यासाठी पोलिसांच्या वतीने नेमलेल्या समितीच्या सदस्यांनी या धर्मांधाची तक्रार लेखी स्वरूपात पोलिसांकडे केली आहे. धर्मांधांचा अतिरेकीपणा आणि देशद्रोही घोषणा याची कल्पना पोलिसांना दिली. पोलीस हा प्रकार घडला कसा आणि त्यामागे कोण आहेत, याचा शोध घेत आहेत. (पोलिसांदेखत ही दंगलसदृश मिरवणूक होत असतांनाच पोलिसांनी तातडीने अधिक कुमक मागवून त्यांना रोखायला हवे होते आणि तत्परतेने त्यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करायला हवे होते. धर्मांधांच्या प्रत्येक प्रसंगात पोलीस धर्मांधांवर गुन्हे प्रविष्ट करण्यास टाळाटाळ करतात, असे लक्षात येते. असे पोलीस अतिरेक्यांपासून जनतेचे रक्षण काय करणार ? - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn