Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दत्तमाला मंत्रपठण करतांना 'दत्तमाला मंत्र लिहिलेल्या कागदावरच दत्तगुरु उभे आहेत', असा भाव ठेवल्यावर दत्तगुरु स्पष्टपणे दिसू लागून त्यांच्या जटेतील केसांवर पसरलेल्या जांभळ्या रंगातून 'जांभळे ॐ' इतरत्र जात असल्याचे दिसणे

     ‘२२.१.२०१६ या दिवशी मी एका संतांनी सांगितल्यानुसार रामनाथी आश्रमात सामूहिक दत्तमाला मंत्रपठण करण्यासाठी सकाळी ९.४० वाजता बसले होते. मी '‘दत्तमाला मंत्र लिहिलेल्या कागदावरच दत्तगुरु उभे आहेत'’, असा भाव ठेवून पठण चालू केले. काही वेळाने मला पठण करतांना आनंद वाटू लागून ‘'मी दत्तगुरुंनाच त्यांची स्तुती ऐकवत आहे'’, असे जाणवू लागले. मला कागदावर दत्तगुरु स्पष्टपणे दिसू लागले.
काही वेळातच मला दत्तगुरुंच्या जटेतील केसांच्या काळया भागावर जांभळा रंग जमल्याचे दिसले. त्यातून '‘जांभळे ॐ’' निघून इतरत्र पसरत होते. त्यानंतर मला तेजस्वी पिवळा रंग पसरल्याचे दिसून काही वेळाने तो रंग वेगाने पुढे सरकून कागदावर करडा (भुरकट) रंग पसरतांना दिसला.’
 - श्रीमती मनीषा केळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn