Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा येत्या अधिवेशनात मांडू ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवीन कायदा करण्यासमवेत आहे त्या कायद्यांची 
प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीची उपाययोजना आवश्यक !  
     नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) - पत्रकार हा लोकशाहीचा ४ था आधारस्तंभ असून त्यांच्यासाठी सरकार सकारात्मक आहे. पत्रकारांवरील आक्रमणे रोखण्यासाठी कायदा केला पाहिजे, ही शासनाची मानसिकता आहे. या कायद्यासंबंधी पत्रकार संघटनांच्याही सूचना घेतल्या असून कायद्याचा मसुदा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संमतीसाठी ठेवू, तसेच त्यानंतर तो मसुदा येत्या मार्च अधिवेशनातही मांडू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी पत्रकारांवर होणार्‍या आक्रमणांच्या अनुषंगाने विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की, सरकार प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी असून त्यांना सवलतीत घरे मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेमध्येही प्रयत्न करण्यात येईल. त्याचसमवेत पत्रकारांसाठी निवृत्ती योजना देण्याचाही शासन सकारात्मक विचार करत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn