Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शिवसेनेचे आमदार तुकाराम काते विधानभवनात आले अनवाणी चालत !

नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ केली कृती !
      नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - मुंबई येथील अणूशक्तीनगर परिसरात मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ विधानभवनाच्या आवारात मुंबई येथील अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. तुकाराम काते १४ डिसेंबर या दिवशी विधानभवनाच्या आवारात चक्क चप्पल न घालताच आल. (पाणीपुरवठा करण्यासाठी लोकप्रतिनिधींना असे आंदोलन करावे लागत असेल, तर सामान्य लोकांचे काय होत असेल, याचा विचारही न केलेला बरा ! लोकप्रतिनिधींच्या मागण्यांना केराची टोपली दाखवणारे प्रशासन जनहितकारी योजना काय राबवणार ? शासनाने संबंधितांना घरी बसवून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! - संपादक)       अणूशक्तीनगर भागात दाट लोकवस्ती आहे; मात्र येथील नागरिकांना पाण्यासाठी तीन डोंगर उतरून पाणी आणावे लागते. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी टाक्या बांधून पाणी वर चढवण्यात यावे, अशी योजना आहे; मात्र मुंबई महानगरपालिका या योजनेत आडमुठी भूमिका घेत आहे, असे श्री. काते यांनी आरोप केला आहे. शिवसेनेचा आमदार असलो, तरी हे आंदोलन मुंबई महानगरपालिकेविरुद्ध आहे, असेही ते म्हणाले.
      निधी मिळूनही पाणीपुरवठा योजना चालू न झाल्याने अनवाणी फिरून काते यांनी याचा निषेध केला आहे. जोपर्यंत नागरिकांना पाणी मिळणार नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा निश्‍चय श्री. काते यांनी केला आहे. श्री. काते यांच्या या अनोख्या आंदोलनाची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आता काय भूमिका घेते, यावर श्री. काते यांचे लक्ष लागून राहिले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn