Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘नवा बंगाल’ या नावाचा वेगळा स्वतंत्र देश स्थापन करावा ! - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्याकडे निखील बंग नागरिक संघाची मागणी

असाहाय्य बांगलादेशी हिंदूंच्या अधिकारांच्या संरक्षणार्थ 
त्यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचा नैसर्गिक मित्र असलेल्या 
भारताने तत्परतेने पाऊल उचलणे अपेक्षित आहे. सातासमुद्रापलीकडे असलेल्या 
अमेरिकेसमोर त्यांना हात पसरावे लागणे, हे भारतासाठी लज्जास्पदच नव्हे का ?
बांगलादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांक यांची स्वतंत्र देशाची मागणी !
     कोलकाता - बांगलादेशातील धर्मांधांच्या अत्याचारांना कंटाळून भारतात शरण घेतलेले ४ कोटी हिंदू आणि बांगलादेशात अद्यापही जीव मुठीत धरून अत्यंत अमानवीय अवस्थेत तग धरून असलेले २ कोटी हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक यांच्यासाठी ‘नवा बंगाल’ या नावाचा वेगळा स्वतंत्र देश स्थापन करावा, अशी मागणी येथील निखील बंग नागरिक संघाचे महासचिव श्री. सुभाष चक्रवर्ती यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांना एक पत्र लिहून केली आहे. यात त्यांनी वर्ष १९४७ पासून बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्यांक यांची होत असलेली परवड कथन केली आहे.
१. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाची निर्मिती होण्याच्या पूर्वीपासून तेथील हिंदूंंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. त्यानंतर स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाल्यावर हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक यांच्या स्थितीत पालट घडेल, अशी आशाही धुळीस मिळाली आहे. 
२. बांगलादेशातील धर्मांधांनी तेथील हिंदू आणि अल्पसंख्यांकांची भूमी बळकावणे, त्यांच्या घरांवर आणि दुकानांवर आक्रमणे करून लुटालूट करणे, महिलांवर बलात्कार करणे आणि अनेक हिंदूंची निर्घृण हत्या करणे, असे अत्याचार केल्यामुळे आतापर्यंत ४ कोटी बांगलादेशी हिंदूंनी भारतात शरण घेतली आहे. मात्र तेथेही त्यांना दयनीय अवस्थेत रहावे लागत आहे. 
३. भारतात स्पष्ट शरणार्थी धोरण अस्तित्वात नसल्याने या हिंदूंना इतर नागरिकांना मिळणार्‍या सोई-सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. राष्ट्रसंघाने शरणार्थीसाठी जे नियम घालून दिले आहेत, त्याचे पालन केले जात नाही. याशिवाय आजही बांगलादेशमध्ये २ कोटी हिंदू आणि अल्पसंख्यांक हलाखीचे जीवन जगत आहेत. म्हणून या सर्वांवर उपाय म्हणून ६ कोटी हिंदूंसाठी ‘नवा बंगाल’ या नावाने वेगळा स्वतंत्र देश स्थापन करणे अनिवार्य झाले आहे.
४. त्यासाठी बांगलादेशमधील ६४ जिल्ह्यांपैकी २५ जिल्हे हे मुसलमानेतर नागरिकांसाठी देण्यात यावेत. या जिल्ह्यांची माहिती आणि त्यातील क्षेत्रफळ याची आकडेवारी या निवेदनात दिली आहे. 
     या नवीन देशात सुंदरबन हे जंगल आणि २६ छोटी बेटे यांचा समावेश असेल. या नवीन देशाची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ एका देशाला शोभेल असेच राहील. तरी या सूचनेवर अमेरिकेने विचार करून निर्णय घ्यावा, अशी विनंती निखील बंग नागरिक संघाने डोनॉल्ड ट्रम्प यांना केली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn