Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नववर्ष ३१ डिसेंबरला नाही, तर गुढीपाडव्याला साजरे करा ! - सौ. शोभा कामत, सनातन संस्था

बैंदूर (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा 
डावीकडून कु. रेवती मोगेर, सौ. शोभा कामत आणि दीपप्रज्वलन करतांना श्री. विजयकुमार
   बैंदूर (कर्नाटक) - सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. इतर धर्मियांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याची लाज वाटत नाही; मात्र हिंदू कपाळावर टिळा लावण्यासही लाजतात. आपण पाश्‍चात्य संस्कृतीचा अवलंब न करता हिंदु संस्कृतीचे पालन केले पाहिजे. त्यामुळे नववर्ष ३१ डिसेंबरला साजरे न करता गुढीपाडव्याला साजरे करूया, असे आवाहन सनातन संस्थेच्या सौ. शोभा कामत यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ डिसेंबर या दिवशी येथील श्री सीतारामचंद्र कल्याण मंदिरामध्ये हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत कामत बोलत होत्या. या सभेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजयकुमार आणि रणरागिणी शाखेच्या 
कु. रेवती मोगेर यांनीही संबोधित केले. 
दुष्प्रवृत्तींच्या विरोधात समाजाने जागृत झाले पाहिजे ! - विजयकुमार, हिंदु जनजागृती समिती
  ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजेच रामराज्य ! केवळ संविधानात ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाचा अंतर्भाव केल्याने रामराज्याची अनुभूती येणार नाही. त्याआधी प्रशासन आणि सामाजिक क्षेत्र यांमधील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात समाजाने जागृत झाले पाहिजे. 
महिलांनो, रणरागिणी बना ! - कु. रेवती मोगेर, रणरागिणी शाखा
   हिंदु महिलांना प्रतिदिन अत्याचार आणि अपहरण यांचा सामना करावा लागत आहे. हे थांबवण्यासाठी त्यांनी धर्माचरणासह स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन रणरागिणी झाले पाहिजे.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn