Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

३१ डिसेंबरच्या निमित्ताने अपप्रकार रोखण्यासाठी योग्य ते प्रयत्न करू ! - ईश्‍वरपूर तहसीलदार

तहसीलदारांना (डावीकडे) निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
ईश्‍वरपूर - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलवीत, या मागणीसाठी ईश्‍वरपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने तहसीलदार श्रीमती सविता लष्करे यांना निवेदन देण्यात आले. यावर तहसीलदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत अपप्रकार रोखण्यासाठी योग्य ते प्रयत्न करू, असे सांगितले. तहसीलदारांनी समितीच्या कार्यकर्त्यांचे संपर्क क्रमांक घेत आवश्यकता लागल्यास दूरभाष करू, असेही सांगितले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री स्वप्नील माळी, प्रशांत पाटील, तसेच हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn