Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाश्‍चात्यांच्या अंधानुकरणात वहावत जाणार्‍या देशाच्या भावी पिढीला वाचवा !

हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेचे जनतेला आवाहन 
‘सनबर्न फेस्टिव्हल’ला गोव्यातील जनतेप्रमाणे कायमचे हद्दपार करा ! 
हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने सावंतवाडी येथे करण्यात आलेले आंदोलन
   सावंतवाडी, २२ डिसेंबर (वार्ता.) - सध्या पाश्‍चात्त्यांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे नववर्ष गुढीपाडव्याला नव्हे, तर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे केले जात आहे. या रात्री मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन करणे, भरधाव वेगाने वाहने चालवणे, मोठ्या आवाजात फटाके फोडणे, बीभत्स गाण्यांच्या तालावर अश्‍लील अंगविक्षेप करत नाचणे, आदी कृत्ये सर्रास होत आहेत. नैतिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेल्या युवा पिढीला अशा वेळी छत्रपती शिवरायांच्या जीवनाचा आदर्श घेण्यास सांगायला हवे; मात्र आपले दुर्दैव असे की, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे स्मारक असलेले गड-कोट आज मौजमजा, मेजवान्या (पार्ट्या) यांसाठी उपयोगात आणले जात आहेत. त्यामुळे गडकोटांचे पावित्र्यही धोक्यात आले आहे. ‘रेव्हपार्टी’, ‘हुक्कापार्टी’ आदींमधील युवकांचा सहभाग याची गंभीरता दर्शवतो; मात्र पाश्‍चात्य विकृतीला प्रोत्साहन देणारे आणि भारतीय युवा पिढीला अमली पदार्थांच्या गर्तेत ढकलून नासवणारे ‘सनबर्न फेस्टिव्हल’ गोव्यातील जनतेप्रमाणे कायमचे हद्दपार करून सांस्कृतिक अस्मिता जपा, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने २१ डिसेंबर या दिवशी गांधी चौक, सावंतवाडी येथे करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाच्या वेळी करण्यात आले.
   या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. अंजली मणेरीकर यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. आंदोलनानंतर सावंतवाडीचे तहसीलदार श्री. सतीश कदम यांना उपरोक्त विषयाच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. पल्लवी पेडणेकर, सौ. दिया शिरोडकर, सौ. कालिंदी सावंत, सौ. तृप्ती शिरोडकर, सौ. पूजा शिरोडकर, सौ. प्रतीक्षा सावंत, सौ. रश्मी कविटकर, सौ. भाग्यश्री सावंत यांच्यासह ५० महिला उपस्थित होत्या.
३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी
प्रशासनाने योग्य ती पावले उचलवीत
! - सौ. अंजली मणेरीकर, रणरागिणी शाखा 
   स्वातंत्र्यानंतर हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने पाश्‍चिमात्य संस्कृतीचा पगडा वाढत आहे. हिंदु धर्मात असलेली प्रत्येक परंपरा महान आहे. त्यामुळे हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष हे गुढीपाडव्यालाच साजरे केले पाहिजे. भारतीय संस्कृतीशी संबंध नसलेले 
  ३१ डिसेंबरसारखे सर्वच प्रकार या देशातून हद्दपार झाले पाहिजे. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, असे आवाहन सौ. अंजली मणेरीकर यांनी केले.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn