Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रोहिंग्या आणि वंशसंहार !

संपादकीय
      म्यानमार म्हणजेच पूर्वीचे बर्मा ! येथील रोहिंग्या मुसलमानांचा तेथील सैन्याने वंशसंहार आरंभल्याची टीका शेजारील मलेशिया या मुसलमानबहुल राष्ट्राने केली आहे. तसेच हे प्रकरण म्यानमारची अंतर्गत समस्या नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर याची नोंद घेतली जावी, अशी मागणी होत आहे. भारतियांना आणि त्यातही मुंबईकरांना ऑगस्ट २०१२ मध्ये मुंबईच्या आझाद मैदानात रझा अकादमीने काढलेला हिंसक मोर्चा आठवत असेल, तर हा मोर्चा म्यानमारमध्ये वर्ष २०१२ मध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या तेथील बौद्धांनी केलेल्या हत्यांवरूनच होता. मुंबईतील रझा अकादमीचा हा मोर्च्याच एवढा भयंकर होता की, यात ४५ पोलीस घायाळ झाले होते, मोर्चेकरांनी महिला पोलिसांवर हात टाकला होता, प्रसारमाध्यमांच्या ‘ओबी व्हॅन’ जाळल्या होत्या, अमर ज्योती स्तंभावर लाथ मारून अवमान करण्यात आला होता. एकूण सरकारी संपत्तीची अडीच कोटी रुपयांची हानी झाली होती. असा मोर्चा पाहून कोणता शहाणा भारतीय म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांविषयी सहानुभूती दर्शवेल ? म्यानमारमध्ये या समस्येने आता पुन्हा डोके वर काढण्याचे कारण म्हणजे रोहिंग्या मुसलमानांना म्यानमारमध्ये नागरिकत्वाचे समान अधिकार हवे आहेत, जे १९८० च्या दशकात तेथील सैनिकी सत्तेने नाकारले होते. या अधिकारासाठी लढणारा रोहिंग्यांचा एक गट आहे. या गटाने ऑक्टोबर मासात म्यानमारच्या काही सैनिकांवर जीवघेणे आक्रमण करून त्यांच्या हत्या केल्या आणि म्यानमार सैन्याने प्रतिआक्रमण करतांना रोहिंग्यांच्या संहारास प्रारंभ केला. यातून भारतातील सहिष्णु हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात येते. 
रोहिंग्यांचा इतिहास !
      रोहिंग्या मुसलमानांचा इतिहास पाहिल्यास हे मुसलमान १४ व्या शतकात म्यानमारमधील आरकान परिसरात पहिल्यांदा स्थायिक झाले. त्या वेळी तेथे बौद्ध राजा नरमेखला याची सत्ता होती. हा राजा मुसलमान विचारवंत आणि अधिकारी यांना निमंत्रित करत असे. नंतरच्या बौद्ध राजांनी तत्कालीन मोगल बाहशाहांप्रमाणे वर्तन करायला प्रारंभ केला आणि सैन्यातील अन् प्रशासकीय पदांनाही मुसलमान नावे दिली. त्यानंतर वर्ष १७८० मध्ये दक्षिण बर्मामधील बौद्धांनी आक्रमण करून या रोहिंग्या मुसलमानांना हाकलून लावले किंवा ठार मारले. आरकान हा परिसर बांगलादेशला टेकून आहे. जवळपास ३५ सहस्र मुसलमान पळून बंगालमध्ये आले. तेव्हा बंगालमध्ये इंग्रजांची सत्ता होती. त्यांनी या मुसलमानांना साहाय्य करतांना आरकान कह्यात घेतले आणि पळून आलेल्या रोहिंग्या मुसलमानांबरोबरच बंगालमधील काही मुसलमानांना आरकानमध्ये वसवले. तेव्हापासून तेथील बौद्ध आणि रोहिंग्या यांच्यातील संघर्ष चालू आहे, तो आजतागायत. वरील इतिहासातून आपण मुसलमानांना देशात आमंत्रित केल्याचा दूरगामी परिणाम काय होतो ? ते समजून घेऊ शकतो. 
बंगाली हिंदूंच्या वंशसंहाराचे काय ?
      रोहिंग्यांच्या हत्यांवरून किंवा त्यांच्या विस्थापित होण्यावरून मलेशिया हा मुसलमान देश आवाज उठवतो, वर्ष २०१२ मध्ये भारतातील रझा अकादमीसारख्या धर्मांधांनीही आवाज उठवला होता, तर पॅलेस्टिनींवरील आक्रमणाविरुद्धही भारतासह जगातील मुसलमान आवाज उठवतात. रोहिंग्यांची समस्या ही त्यांच्यामुळे निर्माण झाली आहे कि तेथील बौद्धांमधील हिंसक प्रवृत्तीमुळे आहे, यात शिरण्यापेक्षा भारतातील हिंदूंनी धर्मांधांकडून संघटितपणा शिकणे उचित ठरेल. आपल्याला बौद्ध म्हटले की, शांतीप्रिय वाटतात; परंतु रोहिंग्यांच्या समस्येवरून आणि चीनच्या विस्तारवादी भूमिकेवरून, बौद्ध देशांविषयीचा हिंदूंचा गैरसमज दूर व्हायला हरकत नाही. धर्मांधांवर कुठेही आक्रमण झाले की, इतरत्रचे धर्मांध सरकारी पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवतात. याउलट बांगलादेशमधील हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत असतांना भारतात सरकारी पातळीवर शांतता दिसते, तसेच पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ टी-शर्ट घालून फिरणारे हिंदूंही गप्प आहेत. बांगलादेशमध्ये हिंदूंवर जी आक्रमणे होत आहेत, तोही तेथील हिंदूंचा वंशसंहारच आहे; परंतु तसे आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलून दाखवण्याचे धाडस आपण का करत नाही ? आपण धर्मनिरपेक्ष आहोत किंवा भारतातील सर्व धर्मियांचे नेतृत्व करत आहोत म्हणून ? मग बांगलादेशमधील हिंदूंकडे हिंदु म्हणून न पहाता बांगलादेशमधील एक समाज म्हणून पहा. तसे पाहिले, तरी त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवायला नको का ?
तथाकथित धर्मनिरपेक्षतावाल्यांची धर्मांधता !
     विस्थापित किंवा अत्याचारग्रस्त यांच्याकडे पहातांना धर्मांध दृष्टीकोनातून पहाण्याची अश्‍लाघ्य प्रथा काँग्रेस आणि इतर तथाकथित धर्मनिरपेक्षतावाल्यांनी चालू केली. त्यामुळे विस्थापित किंवा अत्याचारग्रस्त हिंदू असतील आणि त्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला, तर आपल्यावरचा धर्मनिरपेक्षतेचा शिक्का पुसला जाईल, अशी राजकीय स्वार्थ जोपासणारी भीती या तथाकथित धर्मनिरपेक्षतावाल्यांना वाटते. त्यामुळेच काश्मिरी हिंदूंवर आणि आता पाकिस्तान अन् बांगलादेशमधील हिंदूंवर विस्थापित होण्याची वेळ आली आणि त्याचबरोबर भारत किंवा तेथील हिंदू आपले काही वाकडे करू शकत नाहीत, अशी मुजोरीही धर्मांधांच्यात निर्माण झाली. या सर्व समस्यांवरील उपाय म्हणजे केवळ मानवाचेच नाही, तर सर्व प्राणिमात्रांचे हित पहाणार्‍या हिंदु राष्ट्राची स्थापना !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn