Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकानिमित्त भव्य शोभायात्रा !

   मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक कीर्तीच्या स्मारकानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या नद्यांचे जल आणि मातीचे कलश यांची चेंबूर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांसह भाजपच्या नेत्यांनी सहभाग घेतला. या भव्य शोभायात्रेतील सर्व कलश मुख्यमंत्र्यांकडे सोपवले गेले. शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी आणि शिवकालीन वातावरणनिर्मिती करण्यासाठी सरकारने नितीन देसाई यांच्याकडून मेघडंबरी किल्ल्यांचा देखावा साकारला होता. 
   शिवस्मारकासाठी जळगावमधील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी तापी, पूर्णा, गिरणा, पांझरा आणि बोरी नद्यांचे पाणी संकलित केले, तर संत मुक्ताई, चांगदेव, सखाराम महाराज आणि असीरगडमधली माती एकत्र केली. कोल्हापूर येथील पन्हाळा, विशाळगड, सामानगड, भुदरगड, रांगणा अशा किल्ल्यांवरील माती आणि पंचगंगा, तसेच कृष्णेच्या संगमाचे जल संकलित करण्यात आले. नांदेडमधील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावरील माती भाजपच्या पदाधिकार्‍यांनी संकलित केली. अहमदनगरमध्ये मुळा, प्रवरा आणि सीना नदीचे पाणी, तर प्रेमगिरी किल्ला, विश्रामगड, भुईकोट किल्ला, हरिश्‍चंद्रगड, रतनगड आणि खर्डा किल्ला येथील माती संकलित करण्यात आली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn