Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त झालेले नाडीवाचन ऐकतांना चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथील साधकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
१. नाडीवाचन ऐकत असतांना तहान-भूक आणि त्रास यांचा विसर पडून 
आनंद वाटणे अन् गुरुदेवांवरची श्रद्धा वाढून सर्वकाही देवावरच सोपवणे
    त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वत:विषयीच्या विचारांनी निराशा आली होती. नाडीवाचन ऐकायला मिळालेे, यासाठी कृतज्ञता व्यक्त झाली. डोळ्यांतून सतत भावाश्रू वहात होते. वाचन चालू असतांना सतत प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होत होती. नाडीवाचनातील गुरुदेवांविषयीची सूत्रेे ऐकून त्यांच्यावरची श्रद्धा वाढली आणि सर्वकाही देवावरच सोपवले. सत्संग ऐकतांना तहान-भूक आणि त्रास यांचा विसर पडून आनंद वाटत होता. गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ !’- कु. सिमंतिनी शेटे, पोफळी, तालुका चिपळूण.
२. आरंभी त्रासदायक वाटणे आणि नंतर आनंद मिळून भावजागृती होणे
      ‘नाडीवाचनाला आरंभ झाल्यावर प्रथम थोडा वेळ मला त्रासदायक वाटले; मात्र नंतर ‘नाडीवाचनात पुढे काय सांगणार आहेत’, अशी उत्सुकता वाटू लागली. मला आनंद मिळून भावजागृती झाली. गुरूंप्रती प्रेम वाटू वाटले. नाडीवाचनाचा ५ घंट्यांचा कालावधी आनंददायी वाटला.’ - श्री. सूर्यकांत राजाराम खेतले, असुर्डे, तालुका चिपळूण.
३. इतर सत्संग ऐकतांना झोप येते; मात्र नाडीवाचन ऐकतांना झोप न येता भावजागृती होऊन डोळ्यांतून पाणी येत होते. - श्री. सुनील गांधी, सावर्डे, तालुका चिपळूण.
४. ‘नाडीवाचन संपूच नये’, असे वाटणे
     ‘नाडीवाचन ऐकतांना मला प्रारंभापासून शेवटपर्यंत चैतन्य आणि उत्साह जाणवत होता. ‘नाडीवाचनात पुढे काय सांगणार आहेत’, अशी उत्सुकता वाटत होती. ‘नाडीवाचन संपूच नये’, असे वाटत होते.’ कार्यक्रम संपल्यावरही ‘आणखी नाडीवाचन व्हायला हवे’, असे वाटत होते. - श्री. शिवराम बांद्रे, सावर्डे, तालुका चिपळूण.
५. आपोआप नामजप होणे, तोंडात गोड चव येणे आणि उपाय होऊन हलके वाटणे
    ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपस्थितीत होणारे नाडीवाचन ऐकतांना भावजागृती होत होती. मनात येणारे अनावश्यक विचार आणि ताण नष्ट होऊन आनंद झाला. माझे मन एकाग्र होऊन आपोआप नामजप होत होता. शेवटी तोंडात गोड चव आली. मला हलके वाटले.’ - डॉ. (सौ.) गौरी याळगी, पिरलोटे, चिपळूण.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn