Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
     सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे.  त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१४.१२.२०१६  तिरुवण्णामलई, तमिळनाडू
    सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक १०७मध्ये महर्षि म्हणतात  या ३ - ४ वर्षांत भीषण आपत्काळ आहे. खरेतर हा युद्धाचाच काळ आहे. अशा वेळी या देशाच्या राजाने (पंतप्रधान मोदी यांनी) राजसूय यज्ञ करायला हवा. पूर्वी महाभारतकालात युधिष्ठीराने हा याग केला होता. तेव्हा तर त्याच्याबरोबर प्रत्यक्षात श्रीकृष्ण होता. साक्षात् श्रीकृष्ण असतांना युद्धाची काय आवश्यकता होती ? त्याने एका क्षणात दृष्प्रवृतींचे निर्मूलन केले असते. श्रीरामालाही युद्ध करून सीतेला आणण्याची काय आवश्यकता होती ? त्याच्यात युद्ध न करताही सीतेला आणण्याचे सामर्थ्य होतेच. सध्या पृथ्वीवर देवही नाही आणि धर्मही उरला नाही. त्यामुळे आता युद्ध अटळ आहे. आजच्या दिवसापासून साधकांनी सतर्कता बाळगायला हवी. आपत्काळ वाढत आहे. नैसर्गिक आपत्ती येतील. कधीही कुठूनही घरात पाणी येईल. जोरात वादळ होईल. भूकंप होऊन घरे पडतील, ज्वालामुखी भडकतील. अपघात होतील. (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक १०७, तिरुवण्णामलई, तमिळनाडू, १४.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn