Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नावाचा देवाने सुचवलेला भावार्थ !

     दैनिक सनातन प्रभातच्या श्री दत्तजयंती विशेषांकातील सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी लिखाण वाचून त्यांच्या नावाविषयी देवाने सुचवलेले विचार गुरुमाऊली आणि सद्गुरु (सौ.) अंजलीताई यांच्या चरणी अर्पण करते.
स - सद्गुणी, सतत सेवारत आणि सहजावस्थेत असणार्‍या
द् - दहाही दिशांना अध्यात्माचा प्रसार करणार्‍या
गु - गुरुमाऊलीच्या अनुसंधानात असणार्‍या
रु - रात्रंदिवस गुरुसेवेचा ध्यास असणार्‍या
अं - अहंकार नसणार्‍या आणि अखंड सेवारत असणार्‍या
ज - जातील तेथे सर्वांची मने जिंकणार्‍या
ली - लहान होऊन सर्वांवर निरागस आणि निरपेक्ष प्रेम करणार्‍या
गा - गोड वाणी असणार्‍या
ड - महर्षींच्या लाडक्या
गी - गुरुमहिमेची आणि अध्यात्माची गीता गाणार्‍या
ळ - सर्वांना गुरुमाऊलीचा लळा लावून गुरुमहती सर्वदूर पसरवणार्‍या, तसेच स्वत: कृती करून सर्वांसाठी आदर्श असणार्‍या
सद्गुरु (सौ.) अंजलीताईंना सर्व साधकांकडून कोटी कोटी नमस्कार !
- सौ. सविता मनोहर शेणवी, कराड, जिल्हा सातारा (१३.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn