Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील २१ मनोरुग्णांच्या मृत्यू प्रकरणांची पुन्हा चौकशी करून दोषींवर कारवाई करणार ! - आरोग्यमंत्री दीपक सावंत

      नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) - येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात ७ मासांत २१ मनोरुग्णांचा मृत्यू झाल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे. या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत लक्षवेधीवर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. मिलिंद माने आणि अन्य यांनी ही लक्षवेधी मांडली होती.
    प्रादेशिक मनोरुग्णालयात प्रशासनाकडून रुग्णांना उपचार न मिळणे, रुग्णांचे हातपाय बांधून सामान्य रुग्णांच्या कक्षात त्यांना ठेवणे, रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, अत्यावश्यक औषधांचा तुटवडा, रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी रुग्णांना होत असलेली मारपीट असे अनेक प्रश्‍न आमदारांनी सभागृहात उपस्थित केले. प्रादेशिक रुग्णालयात मनोरुग्णालयाची देखभाल करण्याकरिता तात्काळ वैद्यकीय अधीक्षक पद भरावे आणि नागपूर शहरामध्ये रस्त्यांवर बेवारस वावरणार्‍या मनोरुग्णांना अमेरिकेच्या धर्तीवर योजना आखून त्यांना दाखल करून घ्यावे, अशी मागणी डॉ. मिलिंद माने यांनी केली. 
    याला उत्तर देतांना डॉ. दीपक सावंत म्हणाले की, नियमानुसार रस्त्यांवरील कोणत्याही मनोरुग्णास प्रादेशिक रुग्णालयात प्रविष्ट करून घेता येणार नाही, तसेच या रुग्णालयातील कोणत्याही मनोरुग्णास मारपीट करण्यात आलेली नाही. उत्पादन होत नसल्याने औषधांचा तुटवडा होता; मात्र रुग्णांना चांगल्या पद्धतीची औषधे देण्यात येतील. तसेच रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पद भरले जाईल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn