Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नोटाबंदीद्वारे सरकारने सामान्यांच्या संपत्तीवरच डल्ला मारला ! - स्टिव्ह फोर्ब्स

   नवी देहली - नोटाबंदीचा निर्णय घेतांना सक्षम पर्यायी व्यवस्था निर्माण न करता केंद्र सरकारने एक प्रकारे लोकांच्या संपत्तीवरच डल्ला मारला आहे. एखाद्या देशातील लोकांनी निवडून दिलेल्या सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेणे माझ्यासाठी धक्कादायकच होते, अशी टीका ‘फोर्ब्स’ या प्रसिद्ध मासिकाचे मुख्य संपादक स्टिव्ह फोर्ब्स यांनी केली आहे. ‘फोर्ब्स’मध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी या निर्णयाचा आणि त्याच्या परिणामांचा सांगोपांग आढावा घेतला आहे.
   या लेखात स्टिव्ह फोर्ब्स यांनी म्हटले की, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे भारतीय नागरिकांचे भविष्य सध्या पणाला लागले आहे. सर्वसामान्य लोकांना नाहक नोटाबंदीचा त्रास सहन करावा लागतो आहे. यामुळे विदेशी गुंतवणुकीवरही भविष्यात परिणाम होऊ शकतो. भारताच्या नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी बघून जगातील इतर देशांनाही धडाच मिळाला आहे. भारताला जगातील महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा आहे; पण त्या दिशेने प्रवास करतांना भारताने प्राप्तिकर आणि व्यावसायिक कर यांचे दर न्यून केले पाहिजेत. त्याचप्रमाणे संपूर्ण कररचनेमध्ये आमूलाग्र पालट घडवून आणले पाहिजेत. विदेशी आस्थापनांना भारतात कोणताही नवा प्रकल्प चालू करतांना असंख्य अडचणींना सध्या सामोरे जावे लागते. भारतात बांधकाम परवाना मिळवणे आणि विजेची जोडणी घेणे या कामांसाठी लागणारा वेळ विचारात घेतला, तर स्थिती पुष्कळ वाईट आहे. जागतिक बँकेने १९० देशांत केलेल्या सर्वेक्षणात पुढे आलेले निष्कर्ष पाहिले, तर या दोन्ही विषयांत भारताचा क्रमांक तळात लागतो. भारतात कोणताही प्रकल्प किंवा कारखाना चालू करण्यासाठी जेवढे निर्बंध लादण्यात आले आहेत, ते दूर केले आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये आवश्यक संमती मिळणे शक्य झाले, तर त्याचा देशाला नक्कीच लाभ होईल.
   नोटाबंदीनंतर शहरांतील तरुण रोजगार नसल्यामुळे गावी परतू लागला आहे. शहरातील छोटे उद्योग तूर्त बंद करण्यात आले आहेत. अनेक मोठ्या आस्थापनांनाही कर्मचार्‍यांचे वेतन कसे द्यायचे, असा प्रश्‍न पडला आहे, याकडेही फोर्ब्स यांनी लेखामध्ये लक्ष वेधले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn