Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

... हाच खरा शिवछत्रपतींचा आशीर्वाद ठरेल !

२४ डिसेंबर या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या प्रारंभासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. छत्रपतींचा आशीर्वाद भाजपच्या समवेत, अशी घोषणा देत सत्ता मिळवलेले भाजप समुद्रात छत्रपतींचे भव्य स्मारक उभारण्यातील पहिले पाऊल टाकत आहे. गेल्या १५ दिवसांपासून राज्याचे माहिती खाते याची माहिती प्रसिद्धी करण्याच्या मागे लागले असून नामांकित दैनिकात अर्धे-अर्धे पान विज्ञापन देण्यात येत असून सर्वत्र फलक लावण्यात येत आहेत. जे छत्रपती शिवाजी महाराज आज केवळ महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर जगासाठी सर्वच गोष्टींत आदर्श आहेत त्यांची प्रेरणा त्यातून मिळावी, या मुख्य उद्देशाने हा खटाटोप चालू आहे; मात्र समुद्रात स्मारक उभारून मूळ उद्देश साध्य होणार आहे का, याचा विचार होताना दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचा स्पर्श जिथे झाला, ते गडकोट हे खरे मुख्य प्रेरणास्रोत असून स्मारक तिथे होणे अपेक्षित आहे. समुद्रातील स्मारकासाठी शासन कोट्यवधी रुपये नव्हे, तर अब्जावधी रुपये व्यय करणार आहे. याउलट छत्रपतींनी जिथे पराक्रम गाजवला ते किल्ले आज भग्नावस्थेत आहेत ! हा विरोधाभास नव्हे का ?
   छत्रपतींचा आशीर्वाद जर हवा असेल, तर शिवछत्रपतींचे विचार नेमके काय होते, हिंदवी स्वराज्य म्हणजे काय, हे समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करणे अपेक्षित आहे. या स्मारकाकडे एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने शासन पहात आहे. हा अयोग्य दृष्टीकोन असून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास जर समोर आणायचा असेल, तर त्यांनी हा पराक्रम जिथे केला, त्या स्मृती जपणे अपेक्षित आहे. श्री. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी त्यांना गडकोट मोहिमेच्या समारोपप्रसंगी रायगडावर बोलावले होते. त्या वेळी श्री. मोदी हे छत्रपतींच्या समाधीसमोर काही काळ ध्यान लावून बसले होते. त्यातूनच त्यांना खरी प्रेरणा मिळाली आणि पुढे ते पंतप्रधानपदापर्यंत जाऊ शकले. ज्याअर्थी शिवछत्रपतींची समाधी जर इतकी प्रेरणा देते त्याअर्थी त्यांचे प्रेरणा देणारे स्मारकही शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने जी भूमी पावन झाली आहे, तेथेच होणे अपेक्षित आहे. 
   भारतीय सैन्याकडे आज अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची कमतरता आहे, तर देशांर्गतही पोलिसांकडे पुरेशी शस्त्रे नाहीत. त्यामुळे स्मारकावर कोट्यवधी रुपये व्यय करण्यापेक्षा सुरक्षेच्या या गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष दिले, त्याचप्रकारे गडकोट संवर्धनासाठी काही निधी व्यय केला, तर खरे छत्रपतींचे विचार आपण आत्मसात करू शकलो, असे म्हणावे लागेल. या दृष्टीने आताच्या राज्यकर्त्यांना विचार करण्याची सुबुद्धी होवो, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn