Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यकर्त्यांनी धर्मनिरपेक्षतेचे ढोंग करून हिंदूंना शाळा-महाविद्यालयांतून धर्मशिक्षण न दिल्याचा दुष्परिणाम दर्शवणारे एक उदाहरण !

एका साधिकेच्या आईला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्याचे 
महत्त्व ठाऊक नसणे आणि ‘स्वतःच्या मुलीने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी 
गाठल्याने तिला पुनर्जन्म नाही’, हे कळल्यावर अज्ञानामुळे साधिकेच्या आईची चिडचिड होणे 
     ‘  २६.२.२०१६ या दिवशी माझी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. त्यामुळे ‘आता मला पुढचा जन्म नाही’, ही आनंदाची वार्ता मी माझ्या आईला सांगितली. तेव्हा तिला राग आला (तिच्या माहितीनुसार परत जन्म मिळाल्याविना जीवनाचे सार्थक होत नाही. त्यामुळे माझ्या आईला ‘मुलीला पुढचा जन्म असायला हवा’, असे म्हणायचे होते.) आणि ती चिडचिड करून माझ्याशी भांडू लागली. त्याच रात्री एका साधिकेने मला भ्रमणभाषद्वारे संपर्क केला. तेव्हा मी तिला माझ्या आईशी बोलण्यास सांगितले. त्या वेळी रागाने आई तिला म्हणाली, ‘‘तुमची भाषा आम्हाला कळत नाही.’’ - एक साधिका
    (वर्ष २०२३ पासून येणार्‍या हिंदु राष्ट्रात प्रत्येक व्यक्तीला बालपणापासूनच ‘ईश्‍वरप्राप्तीच्या दृष्टीने मनुष्यजन्माचे महत्त्व, साधना कशी करावी आणि साधना केल्याने होणारे लाभ’ हे शिकवण्यात येईल. त्यामुळे हिंदु राष्ट्रातील आबालवृद्ध असे सर्वच जण निरंतर आनंदी होतील ! त्या दृष्टीने आतापासूनच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदूंना धर्मशिक्षण देत आहेत. - संपादक)धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn