Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तोंडी तलाक पद्धत घटनाबाह्य ! - अलाहाबाद उच्च न्यायालय

     नवी देहली - मुसलमान समाजात प्रचलित असलेली तोंडी तलाकची पद्धत घटनाबाह्य आहे. ही प्रथा मुसलमान महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘कोणतेही वैयक्तिक कायदेमंडळ हे घटनेपेक्षा मोठे नाही’, अशा शब्दांत ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’लाही न्यायालयाने फटकारले आहे. तोंडी तलाकचे समर्थन करणार्‍या ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
     तीन वेळा तोंडी तलाक म्हणण्याच्या पद्धतीला काही मुसलमान महिला आणि संघटना यांनी सर्वोच्च न्यायालयासह विविध उच्च न्यायालयांमध्ये आव्हान दिले आहे. केंद्र सरकारनेही प्रतिज्ञापत्राद्वारे या पद्धतीला आणि बहुपत्नीत्वाला न्यायालयात विरोध दर्शवला आहे. याच संदर्भातील एका याचिकेवर ८ डिसेंबरला अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्या वेळी खंडपिठाने तोंडी तलाक घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट केले. अशा तलाक पद्धतीला कुराणातही आक्षेप घेण्यात आल्याचे खंडपिठाने या वेळी निदर्शनास आणले.
शहाबानोसारखे व्हायला नको ! - उद्धव ठाकरे
    अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करावा. या निर्णयाचे शहाबानो प्रकरणासारखे व्हायला नको, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
चैतन्यदायी हिंदु धर्मपरंपरा आणि अन्याय्य
तलाक यांची तुलना करणारे खासदार अबू आझमी !
(म्हणे) ‘हिंदूंना त्यांच्या धर्मपरंपरा पालटायला सांगितल्या, तर कसे वाटेल ?’
     न्यायालयाच्या निर्णयावर मी काही बोलणार नाही, असे म्हणत समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमी तलाकचे समर्थन करतांना म्हणाले, ‘‘समजा हिंदूंना सांगितले की, त्यांना मृत्यूनंतर जाळायचे नाही किंवा त्यांच्या अन्य धर्मपरंपरांचे पालन करायचे नाही, तर त्यांना कसे वाटेल, तसेच तलाकच्या संदर्भात आहे.’’ हिंदूंना जर विचारले की, देशातील संविधान मोठे कि धर्माचे संविधान मोठे, तर त्यांचे जे उत्तर असेल, तेच माझे आहे.
७ इस्लामी देशांत तोंडी तलाकवर बंदी !
     जॉर्डन, सुदान, मोरक्को, ट्युनिशिया, इराण, बांगलादेश आणि इंडोनेशिया या इस्लामी देशांमध्ये ३ वेळा ‘तलाक’ म्हणण्याच्या पद्धतीवर बंदी आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn