Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. अश्‍विनी अतुल पवार यांनी दिलेले अमूल्य दृष्टीकोन !

सौ. अश्‍विनी पवार
श्री. संदेश नाणोसकर
     गुरुदेवांच्या कृपेमुळे देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील साधकांना कधी सत्संगाच्या, तर कधी सेवेच्या माध्यमातून वा प्रत्यक्ष सहवासातून सौ. अश्‍विनीताईचा (सौ. अश्‍विनी पवार यांचा) सत्संग मिळतो. देवाने या सत्संगात ताईच्या माध्यमातून दिलेले साधनेचे दृष्टीकोन सर्वांसाठीच आदर्श आहेत.
७. साधनेच्या दृष्टीने 
अ. अध्यात्मातील प्रवासात १०० पैकी ४० पावले चालायची राहिली, तर देव ती पूर्ण होण्यासाठी काय करता येईल, ते बघत असतो; पण आपण ६० पावले झाली, हे पहात असतो. आ. आपली श्रद्धा आणि तळमळ यांवर देवाचे साहाय्य अवलंबून आहे.
इ. मनाला हवे तसे वागण्यापेक्षा देवाला अपेक्षित असे आचरण करायला हवे !
ई. मला जे वाटते, ते समष्टीच्या दृष्टीने योग्य आहे का ?
उ. मनाला देवापासून दूर नेणारा विचार, हा माझ्या साधनेतील अडथळा आहे.
ऊ. आपल्या स्तरावर ज्या कार्यपद्धती आहेत, तेवढ्यापुरते मर्यादित रहायला नको.
ए. साधकांना आपल्याविषयी विश्‍वास वाटायला हवा; कारण साधकांना आपल्याविषयी विश्‍वास वाटला नाही, तर गुरूंना कसा वाटणार ?
ऐ. सनातनच्या एका साधकाकडून जरी चूक झाली, तरी ती चूक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आपली चूक वाटते, तर मला सहसाधकांच्या चुका का स्वीकारता येत नाहीत ?
ओ. कुणी चांगले झाले; म्हणून कौतुक केले, तर प्रेरणा घेऊन पुढे जायचे आणि कुणी चूक सांगितली, तरीही त्यातून योग्य ती प्रेरणा घेऊन पुढे जायचे.
औ. शाळेत परीक्षेच्या वेळी अभ्यास नकोसा वाटतो, तरीही आपण अभ्यास करतो; कारण चांगले गुण मिळवायचे असतात. त्याचप्रमाणे अध्यात्माच्या परीक्षेत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत.
अं. सर्व देवावर सोपवल्यावर आपल्याकडे काही रहात नाही.
क. आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर व्हायला हवा. (पाणी साचले, तर त्याचे डबके बनते. मग तेथे डास, अळ्या इत्यादी निर्माण होतात. त्याचा वापर होत नाही. याउलट झरा असेल, तर पशू-पक्ष्यांनाही त्याच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो.)
ख. देवाने प्रत्येकाला दिलेल्या क्षमतेच्या कक्षा गुरूंसाठी वाढवायच्या असतात.
ग. आध्यात्मिक त्रास आणि स्वभावदोष यांचे वर्गीकरण करायला शिकले पाहिजे.
घ. आपल्याला वाटते तसे करणे, म्हणजे साधना नाही; तर गुरूंना अपेक्षित असे करणे, म्हणजे साधना !
च. साधनेत तडजोड करून चालत नाही.
छ. काय समजून घेतले, यापेक्षा काय समजून घ्यायला हवे, हे लक्षात यायला पाहिजे.
ज. साधनेच्या दृष्टीने योग्य गोष्टी आणि चांगल्या सवयी लावण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे.
- श्री. संदेश नाणोसकर (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.८.२०१६) (समाप्त)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn