Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रोहिंग्या मुसलमानांचा वंशसंहार थांबवा ! - इस्लामी देश मलेशियाचे म्यानमारला आवाहन

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांसाठी जवळचा मलेशिया हा इस्लामी देश आवाज उठवतो,
तर दुसरीकडे पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंसाठी बहुसंख्य हिंदूंचा देश असलेला भारत तोंड उघडत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेनंतरच पालटू शकते !
      कुआलालंपूर - मलेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमारमध्ये होत असलेल्या रोहिंग्या मुसलमानांच्या वंशसंहारावर टीका केली आहे. त्यांचा वंशसंहार त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
     मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, दक्षिण-पूर्व आशियातील काही देशांमध्ये रोहिंग्या मुसलमान रहातात. अशा हिंसाचारामुळे या क्षेत्रातील शांती आणि स्थिरता यांना धोका निर्माण होत आहे. रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्‍न भावनेच्या स्तरावर उठवण्यात आलेला नाही, तर मानवतेच्या दृष्टीने मांडला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.      मलेशियाच्या या भूमिकेमुळे म्यानमार आणि मलेशिया यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. म्यानमारने मलेशियाला स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, त्याने म्यानमारच्या अंतर्गत विषयांमध्ये ढवळाढवळ करू नये.
     मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक ४ डिसेंबरला कुआलालंपूर येथे रोहिंग्या मुसलमानांच्या एकता सभेत सहभागी होण्याची शक्यता आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn