Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जामसंडे, देवगड (सिंधुदुर्ग) येथील सनातनचे साधक श्री. शेखर इचलकरंजीकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. इचलकरंजीकर यांना परात्पर
गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा देऊन
सत्कार करतांना श्री. हेमंत मणेरीकर (डावीकडे)
      ‘श्री. शेखर इचलकरंजीकर यांनी घरी केवळ ते आणि त्यांची पत्नी रहात असतांना पत्नीला घरी साहाय्य करून आणि उतारवयात साधना करून ६१ टक्के पातळी गाठून सर्व साधकांपुढे विशेषतः वयोवृद्ध साधकांपुढे एक आदर्श ठेवला आहे. ‘त्यांची प्रगती उत्तरोत्तर अशीच जलद गतीने होवो’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     देवगड - जामसंडे, देवगड येथील सनातनचे साधक श्री. शेखर इचलकरंजीकर (वय ७१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे त्यांच्या येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी भ्रमणभाषद्वारे १३ डिसेंबर या दिवशी घोषित केले. त्यानंतर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत मणेरीकर यांनी श्री. इचलकरंजीकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा देऊन सत्कार केला.
     पडेल, देवगड येथे २५ डिसेंबरला जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या नियोजनाच्या अनुषंगाने श्री. इचलकरंजीकर यांच्या निवासस्थानी एका बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी आयोजनाच्या संदर्भात चर्चा चालू असतांना ही आनंदवार्ता सर्वांना देण्यात आली. या बैठकीसाठी उपस्थित सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते या सर्वांची ही आनंदवार्ता ऐकून भावजागृती झाली. ‘बैठक चालू होण्यापूर्वी अनेकांना आज काहीतरी विशेष बातमी ऐकायला मिळेल, असे वाटत होते’, असे उपस्थितांनी सांगितले.
श्री. इचलकरंजीकर यांचे साधनारत असलेले कुटुंबीय 
    श्री. इचलकरंजीकर यांची पत्नी सनातनच्या साधिका सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर यांची आध्यात्मिक पातळीही ६२ टक्के आहे. त्यांचे पुत्र अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर हे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर स्नुषा सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर या सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत. 
     या वेळी मनोगत व्यक्त करतांना श्री. इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठू शकलो. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटी कोटी वेळा कृतज्ञता !’’
     सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर यांनी, ‘गुरुदेवांनी आम्हाला त्यांच्या चरणांजवळ अखंड ठेवले. त्यामुळे खूप खूप कृतज्ञता वाटली’, अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली. श्री. इचलकरंजीकर यांची पातळी घोषित होताच श्री. आणि सौ. इचलकरंजीकर यांना भावाश्रू आले.
     अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि सौ. सावित्री इचलकरंजीकर हेही या कार्यक्रमात भ्रमणभाषद्वारे सहभागी झाले होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn