Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा देह आणि चक्र यांवर विराजमान असणार्‍या देवतांचे सूक्ष्मातून झालेले दर्शन अन् त्यांचे कार्य !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
      ‘गुरुमाऊली, एक दिवस सकाळी नामजप करायला बसले होते. तेव्हा सूक्ष्मातून तुमच्याकडे लक्ष गेले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरही नामजप करतांना दिसले. माझे परात्पर गुरूंच्या देहाकडे लक्ष गेल्यावर ‘काही देवता परात्पर गुरु डॉक्टरांना अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी पुढीलप्रमाणे साहाय्य करत आहेत, तर काही देहात आणि काही चक्रांवर विराजमान आहेत’, असे दिसले. 
१. सहस्रारचक्रावर ब्रह्मदेव 
     देवता हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी गुरुदेवांना साहाय्य करत आहे.
२. आज्ञाचक्रावर श्री गणेश 
     येणार्‍या काळासाठी सर्व ग्रंथांचे संकलन करण्यासाठी बुद्धी देणे
सौ. नंदा खंडागळे
३. अनाहतचक्रावर प.पू. भक्तराज महाराज आणि श्रीकृष्ण 
      धर्मावर आलेली ग्लानी दूर करून धर्माचे ज्ञान देणे आणि समाजाचे प्रबोधन करून समाजाला धर्मशिक्षण देणे 
४. मणिपूरचक्र आणि नाभीजवळ साक्षात् श्रीविष्णु 
      हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आणि ईश्‍वरी राज्य आणण्यासाठी साहाय्य करणे 
५. दोन्ही पायांच्या ठिकाणी श्रीराम 
      सत्ययुगाचा आरंभ करण्यासाठी साहाय्य करणे 
६. दोन्ही हातांमध्ये ‘सरस्वती’ 
      लिखाण करण्यासाठी साहाय्य करणे
७. पाठीमागे श्रीलक्ष्मी 
      कार्याला लागणारी शक्ती ती गुरुदेवांना पुरवीत असणे 
      गुरुदेवांना काही देवता कसे साहाय्य करत आहेत, हे गुरुदेवांनी सूक्ष्मातून दाखवून कर्तेपणा स्वतःकडे न घेता ‘देवच सर्व करत आहे’, असे दाखवले. धन्य आहे देवा तुम्ही, धन्य आहात ! 
       गुरुदेवा, ही अनुभूती लिहितांना तोंडामध्ये साखरेची चव लागत होती.’
- सौ. नंदा खंडागळे, नागपूर (२१.८.२०१६) 
स्वप्नात मोठी वाईट शक्ती पाताळात घेऊन जातांना दिसणे, 
त्या वेळी वाचवण्यासाठी प्रार्थना केल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी पाताळातून बाहेर काढणे 
      ‘पाच वर्षांपूर्वी मला एकदा पुष्कळ त्रास होत होता. त्या रात्री झोपल्यावर स्वप्नात मोठी वाईट शक्ती मला पाताळात घेऊन जात असल्याचे दिसले. मी सारखी, ‘मला वाचवा हो ! मला मोठी वाईट शक्तीच्या हातून मरायचे नाही. मला नैसर्गिक मृत्यू आला, तरी चालेल; पण ह्यांच्या हातून मला मरायचे नाही’, अशी सारखी गुरुदेवांना प्रार्थना करत होते. माझा त्रास वाढतच होता. माझे उपायही चालूच होते. माझा तोंडवळा पूर्ण काळा पडला होता. माझ्यासमोर एक मोठा खोका ठेवला होता. त्याच्याकडे बघून उपाय करणे चालू होते. ‘मोठी वाईट शक्ती मला पाताळात नेत आहे’, हे दृश्य मी बघत होते. तेव्हा गुरुदेवा, मी तुम्हाला पुष्कळ आर्ततेने प्रार्थना केली, ‘भगवंता, मला वाचवा !’ त्या वेळी लगेच तुम्ही सूक्ष्मातून आलात. माझ्यासमोर असलेल्या खोक्यात बसलात. माझा एक हात पकडून मोठी वाईट शक्तीने पाताळात नेले असतांना गुरुदेवा, तुम्ही माझा दुसरा हात पकडलात. तुमचा दुसरा हात प.पू. दादाजी वैशंपायन यांनी पकडला होता. तुम्ही मला सहजतेने पाताळातून वर आणलेत. माझा सूक्ष्मदेह घेऊन तुम्ही परत रामनाथी आश्रमात गेलात. तिथे माझ्या सूक्ष्मदेहावर आपण उपाय केलेत. त्यानंतर माझा त्रास हळूहळू न्यून होत गेला आणि मी रात्री झोपी गेले. 
     सकाळी उठल्याबरोबर माझे पुन्हा तुमच्याकडे लक्ष गेले आणि रात्री स्वप्नात तुम्ही माझे मोठ्या वाईट शक्तींपासून रक्षण केल्याचे आठवले. भगवंता, ते आठवल्यावर मी पुष्कळ रडले. ‘देवा, माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास होत आहे हो !’, असे सूक्ष्मातून बोलत असतांना गुरुदेवांनी माझा सूक्ष्मदेह महर्लोकात नेऊन ठेवला. तिथे महर्लोकात असलेल्या दिप्ती पंत आणि सुरेखा केणी यांचे दर्शन झाले.
     देवा, कशी वर्णू तुझी कृपा! लिहितांना शब्द अपुरे पडतात. माझ्यासारख्या सामान्य बालकासाठी एवढे कष्ट घेता. भगवंता, मी तुमच्या चरणी अनन्यभावे शरण येऊन कृतज्ञता व्यक्त करते.’
- सौ. नंदा खंडागळे (२१.८.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn