Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भारत वगळून जगभरातील ३९ राष्ट्रांच्या चलनावर गोमातेची प्रतिमा !

जगातील अनेक राष्ट्रांनी त्यांच्या चलनावर गोमातेला स्थान देणे; मात्र गोमातेला अनन्यसाधारण 
महत्त्व असलेल्या भारतातच येथील चलनावर तिला स्थान नसणे भारतियांसाठी लज्जास्पद !
   ‘भारतीय समाजात गोमातेला महत्त्वपूर्ण स्थान आहे; परंतु तिचे छायाचित्र भारतीय चलनावर आजपर्यंत कधी दृष्टीस पडले नाही. तथापि जगभरातील ३९ राष्ट्रांनी गोमातेला चक्क त्यांच्या चलनावर स्थान दिले आहे. एवढेच नव्हे, तर ६ इस्लामी राष्ट्रांच्या चलनावरही गोमातेची सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील रहिवासी असलेले श्री. तेजकरण जैन यांनी ही माहिती दिली.
१. अन्य राष्ट्रांच्या चलनावरील चित्रे भारतीय राहणीमानाशी मिळतीजुळती !
     श्री. जैन सांगतात, या ३९ राष्ट्रांचे चलन किंवा नाणे यांच्यावर चितारण्यात आलेली गोमातेची प्रतिमा इतकी सुंदर आहे की, ती पाहून ‘हे भारतीय चलनच आहे’, असे वाटते; कारण त्यांच्या चलनांवर छापण्यात आलेली चित्रे ही भारतीय राहणीमानाशी मिळतीजुळती आहेत. नांगराने मशागत करणारा शेतकरी, बांबूची टोपी घातलेला शेतकरी आणि शेतात काम करणार्‍या महिला, असे त्या चित्रांचे स्वरूप आहे. नायजेरिया आणि झिम्बाब्वे यांच्या चलनावरही गोमातेचे चित्र छापले आहे. सध्या बाजारात २ सहस्र रुपयांची नोट आली आहे. त्यावरही गोमातेचे चित्र छापलेले नाही. आपल्या चलनावर गोमातेलाही स्थान मिळणे आवश्यक आहे.
२. नेदरलॅण्डच्या चलनावर बस्तरसारखी संस्कृती !
     नेदरलॅण्डच्या ५०० च्या चलनावर बस्तरसारखी संस्कृती दिसून येते. यात एक महिला शेतात उभी असून तिच्या हातातील टोपलीत भाज्या ठेवलेल्या आहेत आणि शेतकरी बैलांनी शेताची मशागत करत आहे, असे ते चित्र आहे. तसेच नेपाळच्या २५ आणि २५० च्या चलनांवर गोमातेची प्रतिमा आहे.
३. प्राचीन भारतीय शासकांच्या काळातील चलनावरही गोमातेची प्रतिमा !
     श्री. जैन यांच्या संग्रहात पहिल्या आणि दुसर्‍या शतकातील मौर्य, होळकर, गायकवाड, मराठा यांसारख्या अनेक शासकांच्या काळातील प्राचीन नाणी आहेत. त्यांवर गोमातेची प्रतिमा आहे.
४. चलनावर गोमातेचे चित्र प्रसिद्ध करणार्‍या काही राष्ट्रांची सूची !
    फ्रान्स, इटली, गांबिया, दक्षिण आफ्रिका, सुदान, नॉर्वे, नेदरलॅण्ड, कंबोडिया, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, रोमानिया, व्हिएतनाम, मोझाम्बिक, सोमालिया, मंगोलिया, नायजेरिया, केनिया, युगांडा, इराक, बर्मा, मॉरिशस, बांगलादेश, नेपाळ यांसारख्या अनेक राष्ट्रांच्या चलनावर गोमातेचे चित्र आढळून येते. 
५. भारतानेही चलनावर गोमातेचे चित्र प्रसिद्ध करावे !
     श्री. जैन यांनी भारतीय चलनावर गोमातेची प्रतिमा प्रसिद्ध करावी, अशी मागणी भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून केली आहे.’
श्री. तेजकरण जैन यांचा अल्प परिचय !
     श्री. तेजकरण जैन हे छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील रहिवासी आहेत. ते मागील ३० वर्षांपासून गोमातेच्या प्रतिमा असलेले चलन, नाणी, ‘स्टॅम्प’ आणि विविध साहित्य यांचे संकलन आणि जतन करत आहेत. त्यांनी त्यांच्या वरील संग्रहित वस्तूंचे आतापर्यंत अनेक राज्यांत प्रदर्शन भरवले आहे. तसेच ते याविषयी जनप्रबोधनाचेही कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच मागील वर्षी त्यांना छत्तीसगड राज्यशासनाच्या वतीने ‘यतियतन लाल’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn