Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या निमंत्रण बैठकांना ग्रामीण भागात उदंड प्रतिसाद!

जळगाव, १७ डिसेंबर (वार्ता.)- येथे २५ डिसेंबर या दिवशी होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त आयोजित केल्या जाणार्‍या निमंत्रण बैठकांना तालुका आणि ग्रामीण स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
  • भुसावळ, यावल, धरणगाव, पारोळा, एरंडोल, जामनेर, पाचोरा यांसह जळगाव तालुक्यातील ३२ गावांमध्ये सभेचा प्रसार करण्यात आला. 
  • आतापर्यंत ग्रामीण भागात ५६ हून अधिक बैठकांमध्ये ४ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात आला आहे.
  • ग्रामीण भागातील एस्.टी. बस, प्रवासी रिक्शा आणि अन्य वाहनांवर सभेच्या निमंत्रणाचे पोस्टर, भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालये आणि इतर गावातील मुख्य चौकांमध्ये बॅनर लावले आहे. 
  • हरिनाम कीर्तन सप्ताहात सभेचा विषय सांगितल्यावर कीर्तनकार किंवा प्रवचनकार २० ते २५ मिनिटे धर्मसभेच्या प्रचाराविषयी मार्गदर्शन करून सभेला उपस्थित रहाण्याविषयी श्रोत्यांना आवाहन करत आहेत.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn