Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांना झालेले वाईट शक्तींचे त्रास आणि आलेली अनुभूती

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
१. झालेले त्रास 
१ अ. सभेतील भाषण संपल्यावर डोळ्यांसमोर अंधारी येऊन चक्कर येणे आणि श्री गणेशाचा नामजप केल्यावर त्रास उणावणे : ‘२३.१०.२०१६ या दिवशी पुणे येथे काश्मिरी हिंदूच्या पुनर्वसनासाठी ‘चलो कश्मीर अभियान’ या संदर्भात सभा आयोजित केली होती. त्या वेळी सनातन संस्थेच्या वतीने वक्ता म्हणून मला बोलण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी भाषण झाल्यानंतर जागेवर येऊन बसल्यानंतर मला चक्कर येऊन डोळ्यांसमोर अंधारी आली. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘आपल्याला त्रास होत आहे.’ प्रार्थना करून मी श्री गणेशाचा १५ मिनिटे नामजप केला. त्यानंतर अंधारी आणि चक्कर येण्याचे प्रमाण न्यून झाले आणि त्रास उणावला.
१ आ. रस्ता दुभाजकावर असलेल्या झुडपातील कुत्र्याने गाडीच्या पुढे अचानक झेप घेणे : २५.११.२०१६ या दिवशी कोल्हापूर ते सोलापूर चारचाकी गाडीने आम्ही (मी आणि चालक-साधक) प्रवास करत होतो. दुहेरी वाहतूक असलेल्या मार्गावरून आम्ही जात होतो. एके ठिकाणी रस्ता दुभाजकावर (डिव्हायडरवर) एक कुत्रा झुडपात बसला होता. आमच्या गाडीच्या पुढे २ - ३ चारचाकी वाहने होती. ती वाहने सोडून कुत्र्याने आमच्या गाडीच्या पुढे अकस्मात् झेप घेतली. गाडी अचानक थांबवावी लागली. ते पाहून माझ्या मनात विचार आला, ‘आपल्यावर पुढे येणारे संकट त्याच्यामुळे टळले असणार.’ 
२. आलेली अनुभूती 
२ अ. अकस्मात् चारचाकी गाडी बंद पडून डिझेलच्या काट्याने डिझेल असल्याचे दाखवणे, प्रार्थना केल्यानंतर गाडी चालू होणे अन् निवासस्थानी पोचल्यावर गाडीत डिझेल नसल्याचे लक्षात येणे : ‘ऑक्टोबर २०१६ मध्ये नवरात्रीच्या कालावधीत रात्री श्री सप्तशृंगी येथील सनातनचे ग्रंथप्रदर्शन बघून आम्ही निवासाच्या ठिकाणी जात असतांना अकस्मात् रस्त्यात गाडी बंद पडली. पुष्कळ प्रयत्न करूनही गाडी चालू होत नव्हती. डिझेलचा काटाही ‘डिझेल आहे’, असे दाखवत होता. ‘नेमकी काय अडचण आहे ?’, ते कळत नव्हते. प्रार्थना करून ‘परत गाडी चालू होते का ?’, ते पाहिले. त्यानंतर गाडी चालू झाली. निवासाच्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्यक्षात डिझेलच्या टाकीत डिझेल नव्हते आणि काटा चुकीचे दाखवत असल्याचे लक्षात आले. केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेने सुखरूप निवासस्थानी पोचलो.’ 
- (सद्गुरु) कु. स्वाती खाडये (२५.११.२०१६)
    या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn