Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कु. दीपाली मतकर हिच्या गंभीर आजारासाठी भृगु महर्षींनी श्री. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून सांगितलेले उपाय

     कु. दीपाली मतकर या साधिकेला डेंग्यू झाल्यामुळे रुग्णालयाच्या अतीदक्षता कक्षात हालवण्यात आले होते. तिच्या प्लेटलेट्सची संख्या ८ सहस्र एवढी खाली आली होती. (सर्वसाधारण व्यक्तीत ती १.५ लक्ष ते ४ लक्ष असते.) दीपालीताईंच्या श्‍वसन प्रक्रियेमध्ये बिघाड झाल्याने तिच्या विविध अवयवांवर विपरीत परिणाम झाला होता. खोकला, लघवी आणि शौच यांमधून रक्तस्राव होत होता. डेंग्यूमुळे तिच्या हृदयाच्या एका बाजूवर परिणाम झाला होता. तिला ताप आला होता. तिची स्थिती अतिशय गंभीर असल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले होते. या वेळी भृगु महर्षींनी होशियारपूरच्या श्री. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून तिला खालील प्रतिबंधक समुपदेश दिले.
१. भृगु महर्षींना प्रार्थना केल्यावर त्यांनी उपाय आणि औषधे सांगणे
    कु. दीपालीताईंचा आजार दूर व्हावा, यासाठी श्री. विशालजी यांनी भृगु महर्षींना प्रार्थना केली. त्या वेळी भृगु महर्षींनी सांगितले, कु. दीपालीताई बरी होईल. एका आठवड्यात तिचा धोका टळेल.
     श्री. विशालजी यांच्याकडून हे कळले आणि भृगु महर्षींकडून मिळालेल्या प्रेरणेनुसार त्यांनी दीपालीताईंना खालील औषधे द्यावी आणि त्याच्या जोडीला उपाय करण्यास सांगितले.
१ अ. होमिओपॅथीक औषधे : खालील प्रत्येक औषधाचे १० थेंब प्रतिघंटा देणे
१. अर्टिका युरेन्स क्यु (Q)
२. एपिस मेल. क्यु (Q)
३. लेडम पाल. क्यु (Q)
१ आ. अन्य उपाय
१. कु. दीपालीला दोन सीताफळे खाण्यास द्यावीत.
२. प्रत्येक मंगळवार आणि शनिवार खालील उपाय करणे
अ. दीपालीताईंनी प्रार्थना करून हिरव्या गवताला स्पर्श करावा आणि नंतर ते गवत गोमातेला खायला द्यावे.
आ. डेंग्यूच्या आजारामुळे दीपालीच्या जिवावर संकट असतांना तिने हात लावलेले गवत गायीने न खाता केवळ हुंगणे अन् दीपाली त्या आजारातून बरी झाल्यावर गायीने तिने हात लावलेले गवत ओढून घेऊन खाणे : २९.१०.२०१६ या दिवशी पहिल्यांदा आध्यात्मिक उपाय म्हणून दीपालीच्या हाताचा स्पर्श झालेले गवत गायीला खायला दिल्यावर गायीने ते केवळ हुंगले; पण खाल्ले नाही. त्या दिवशी दीपालीची स्थिती गंभीर होती. ती रुग्णालयातील अतीदक्षता विभागात होती. त्यानंतर १.११.२०१६ या दिवशी हाच उपाय केला. त्या वेळी गायीने थोडेच हिरवे गवत खाल्ले. त्या दिवशी दीपालीच्या आरोग्यावरील धोका टळल्याने तिला रुग्णालयातील अतीदक्षता विभागातून सर्वसामान्य कक्षात आणले होते. त्यानंतर ५.११.२०१६ या दिवशी दीपालीने हात लावलेले गवत गायीला दिले. गायीने ते गवत हातातून ओढून घेऊन खाल्ले. त्या दिवशी दीपाली आजारातून पूर्ण बरी झाली होती आणि दुसर्‍या दिवशी तिला रुग्णालयातून जाऊ दिले. अशा प्रकारे दीपालीच्या जिवावर संकट असतांना गायीने तिच्या हातचे गवत खाल्ले नाही, तर नुसते हुंगले आणि जेव्हा तिच्यावरील संकट दूर होऊन ती पूर्ण बरी झाली, तेव्हा गायीने तिच्या हातचे गवत ओढून घेऊन खाल्ले. यावरून या आध्यात्मिक उपायांचे महत्त्व लक्षात आले. गुरुमाऊली, तुम्ही अशा प्रकारे दीपालीचा त्रास अल्प केलात.
आ. दीपालीताईंनी प्रार्थना करून शुद्धीकरण न केलेल्या सुवर्णाला स्पर्श करावा आणि ५ रुपयांच्या ५ नाण्यांसह ते भिकार्‍याला द्यावे.
२. विविध आजार दूर करण्यासाठी सांगितलेली औषधे
२ अ. फुफ्फुसातील पाणी : श्री. विशालजी यांनी दोन दिवसांनी फुफ्फुसातील पाणी काढण्यासाठी पुढील औषधांचे प्रत्येकी ४ थेंब दिवसातून दोन वेळा घेण्यास सांगितले.
१. सिलिका १ एम्
२. ट्युबरक्युलिनम् १ एम् 
२ आ. न्यूमोनिया : काही वेळाने श्री. विशालजी यांनी न्यूमोनियासाठी खालील प्रत्येक औषधाचे ४ ते ५ थेंब पाण्यातून दिवसातून ४ वेळा देण्यास सांगितले.
१. कार्बो एनिमलिस ३०
२. हायड्रोकोटाईल ३०
३. एपिस् मेल.३०       
४. टिलिया ३०       
५. कार्डस एम्. ३०       
६. चेलिडोनियम ३०   
७. लेपिस अल्ब ३०
८. डिजिटॅलिस ३०   
९. हायड्रॅस्टीस ३०
१०. मर्क. सॉल. ३०
११. मायरिका ३०       
१२. अर्स आयोड्. ३०       
२ इ. काविळ : दोन दिवसांनी श्री. विशालजी यांनी दीपालीताईंना झालेल्या काविळीसाठी खालील प्रत्येक औषधाचे १० थेंब पाण्यातून दिवसातून ७ वेळा देण्यास सांगितले.
१. चायना क्यु
२. चिओनॅन्थस् क्यु. (Q)   
३. बोलेटस् क्यु. (Q)   
४. टॅराक्सॅटम् क्यु
     भृगु महर्षींच्या आशीर्वादाने कु. दीपालीताईंना अतीदक्षता कक्षातून बाहेर आणण्यात आले. तिच्यामध्ये झालेली सुधारणा पाहून रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनाही आश्‍चर्य वाटले. भृगु महर्षींवरील श्रद्धा आणि श्री. विशाल शर्मा यांनी भृगु महर्षींना केलेली प्रार्थना यांमुळे दीपालीताई आजारातून बरी झाली आणि अवघ्या १० दिवसांत तिला रुणालयातून घरी पाठवण्यात आले. (श्री. विशालजी कु. दीपाली मतकर यांना ओळखत नाहीत.)
    साधकांची काळजी घेणार्‍या भृगु महर्षींच्या चरणी आम्ही कोटी कोटी कृतज्ञ आहोत. भृगु महर्षींना दीपालीताईच नव्हे, तर सर्व साधक प्रिय आहेत. सनातनच्या साधकांसाठी भृगु महर्षींच्या चरणी प्रार्थना करणार्‍या श्री. विशालजी यांच्या प्रतीही आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. भृगु महर्षींच्या चरणी आम्ही सर्व साधक कोटी कोटी कृतज्ञ आहोत.
- श्री. गौरव सेठी, चंदीगढ, हरियाणा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn