Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

उतारवयातही चिकाटीने प्रयत्न करून स्वतःत पालट केेलेले श्री. शेखर इचलकरंजीकर !

१. ‘त्यांच्यात स्वतःत पालट करण्याची तळमळ वाढली आहे. 
२. त्यांची खाण्याची आवड-निवड अल्प झाली आहे.’ - सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर (पत्नी)
३. तत्परता
    ‘पूर्वीच्या तुलनेत बाबांची कृतीशीलता, सतर्कता आणि तत्परता वाढली आहे. बाबा ‘कोणतेही काम किंवा सेवा अल्प वेळेत कशी होईल’, असा विचार करून तत्परतेने कृती करतात.’ - सौ. भाग्यश्री देशमाने, (मुलगी) कराड, सातारा.
४. काटकसरी
    ‘ते पूर्वी वैयक्तिक लिखाणासाठी नव्या कोर्‍या वह्या वापरत असत. आता ते जुन्या आणि पाठकोर्‍या वह्या वापरतात.’ - सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर
५. शिकण्याची वृत्ती
     ‘बाबा स्वतः शिक्षक होते, तरीही ते उपदेशकाच्या भूमिकेत नसतात. त्यांचा शिकण्याचा भाग वाढला आहे.’ - सौ. भाग्यश्री देशमाने
६. स्वीकारण्याची वृत्ती
     ‘ते स्वतःच्या चुका प्रांजळपणे स्वीकारतात. पूर्वी ते जिज्ञासूंंच्या संपर्काला जातांना भ्रमणभाष करून जायचे नाहीत. त्यामुळे त्यांची खेप व्यर्थ जायची. त्यात पेट्रोल आणि वेळ यांचा अपव्यय व्हायचा. याची त्यांना जाणीव करून दिल्यावर आता ते संपर्काला जातांना आधी नियोजन करून आणि संबंधित व्यक्तीला भ्रमणभाष करून जातात. - सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर
७. अपेक्षा न्यून होणे
     पूर्वीच्या तुलनेत त्यांच्या अपेक्षा न्यून झाल्या आहेत. 
७ अ. घरी येणार नसल्याचे कळवल्यावर ‘तू तुझी प्रकृती सांभाळ’, असे सांगणे : मी साधारण ५ - ६ मासांनी (महिन्यांनी) घरी जाते. या वेळी दिवाळीच्या वेळी माझी प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे मी त्यांना सांगितले, ‘‘या वेळी घरी यायला जमणार नाही.’’ हे सांगितल्यावर त्यांनी ते लगेच स्वीकारले. खरेतर दिवाळीच्या वेळी सगळे नातेवाईक एकत्र येतात. या वर्षीही येणार होते; पण अप्पांनी मला सांगितले, ‘‘तू तुझी प्रकृती सांभाळ.’’ - सौ. सावित्री इचलकरंजीकर (स्नुषा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
७ आ. नियोजनात पालट होऊनही स्थिर असल्याचे जाणवणे : ‘७.१२.२०१६ या दिवशी आम्ही सगळे नातेवाईक एका कार्यक्रमानिमित्त कराड येथे एकत्र जमलो होतो. त्या वेळी कार्यक्रम झाल्यावर कोणत्या वेळी देवगडला जायला निघायचे, हे अप्पांनी ठरवले होते; पण काही कारणानिमित्त जाण्याची वेळ पुढे जात होती. त्या वेळी अप्पा पुष्कळ शांत होते आणि ते म्हणाले, ‘‘तुमचे झाले कि सांगा, मग निघू.’’ खरंतर त्यांना अपेक्षित असे झाले नाही, तर काही वेळा त्यांची झालेली तगमग लक्षात यायची; पण या वेळी ते पुष्कळ स्थिर वाटले.’ - अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर (मुलगा) आणि सौ. सावित्री इचलकरंजीकर
८. परेच्छेने वागणे 
अ. पूर्वी मी त्यांना ‘बाहेरची सेवा करू देत नाही. घरकामात साहाय्य करायला लावते’, असे वाटायचे. त्यामुळे त्यांची चिडचिड व्हायची. आता ते ‘घरातील कामे आश्रमातील सेवा करत आहोत’, या भावाने करतात.’ 
- सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर
आ. ‘बाबांचा इतरांचा विचार करण्याचा भाग वाढला आहे. एखाद्याला एखादे सूत्र आवडत नसल्यास बाबा त्याला आवडत असलेल्या विषयावर चर्चा करून त्याच्याशी जवळीक करतात आणि त्याला साधनेकडे वळवतात.’ - सौ. भाग्यश्री देशमाने
९. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
     ‘पूर्वी त्यांचा केवळ सेवा करण्याकडे अधिक कल होता. आता त्यांचे व्यष्टी साधना करण्याचे गांभीर्य वाढले आहे. ते व्यष्टी साधनेचा प्रत्येक २ घंट्यांनी आढावा घेतात. त्यांची झोप आणि अनावश्यक बोलणे अल्प झाले आहे. ते आता नामजपही अधिक काळ करतात.
१०. भाव
     त्यांचा इतरांशी साधनेविषयी बोलतांना पुष्कळ वेळा भाव जागृत होतो.’ 
- सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर
११. समाजातील व्यक्तींनाही पालट जाणवणे
    ‘आम्ही रहात असलेल्या सदनिकेतील शेजार्‍यांनी सांगितले, ‘‘त्यांच्या वयाच्या लोकांपेक्षा ते अधिक प्रसन्न आणि आनंदी वाटतात.’’ - सौ. भाग्यश्री देशमाने
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn