Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

स्वामीनारायण संस्थे’चे साधक श्री. धनाजी लक्ष्मण कमळकर यांना देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे

     ‘मी ‘स्वामीनारायण संस्थे’च्या सत्संगात जातो. मी देशप्रेम आणि धर्मप्रेम यांना प्रेरणा देणार्‍या सनातन संस्थेच्या देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात सेवा करण्याच्या उद्देशाने गेलो होतो. तेथे ४ दिवस सेवा केल्यावर मला जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. सनातनच्या आश्रमात प्रथम पाऊल ठेवताच ‘
सत्ययुगातच आलो आहे’, अशी दिव्य अनुभूती येणे
     मी देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात प्रथम पाय ठेवला. तेव्हा मला एक दिव्य अनुभूती आली. मी ‘सत्ययुगातच आलो आहे’, असे मला वाटले. मी तेथे प्रतिदिन ध्यानमंदिरात जाऊन इष्टदेवतेचे ध्यान करतांना पुष्कळ चांगले वाटायचे.
२. भोजनकक्षात भोजनाच्या वेळी प्रत्येक साधक 
स्वतःच्या चुका सांगतांना पाहून मन भारावून जाणे
     येथील साधक परस्परांशी प्रेमाने आणि आपलेपणाने वागतात. तसेच भोजनकक्षात भोजनाच्या वेळी प्रत्येक जण निष्कपटपणे आपल्या हातून झालेल्या चुका सांगतात किंवा वाचून दाखवतात आणि प्रायश्‍चित्तही घेतात. हे पाहून माझे मन भारावून जाते.
३. प्रसाधनगृहात पडलेले पैशांचे पाकीट साधकाने प्रामाणिकपणे आणून देणे
      एके दिवशी मी प्रसाधनगृहात गेल्यावर माझे पैशांचे पाकीट पडले; पण त्याविषयी मला ठाऊक नव्हते. ते पाकीट आश्रमात श्री. सुभाष म्हात्रे या साधकाला सापडले. तेव्हा त्यांनी आश्रमातील साधकाकरवी ते मला परत दिले. तेव्हा या प्रसंगातून मला वाटले, ‘या संस्थेचे साधक असे प्रामाणिक आहेत, तर त्यांचे गुरु किती उच्च कोटीचे असतील ? हे साधक निश्‍चितच आपल्या ध्येयाप्रत जातील ! 
     सनातन संस्थेला कोटी कोटी धन्यवाद !’ 
- श्री. धनाजी लक्ष्मण कमळकर, महावीरनगर, कांदिवली (पश्‍चिम), मुंबई. (सप्टेंबर २०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn