Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

फारुख अब्दुल्ला यांचे हुरियत कॉन्फरन्सच्या स्वतंत्र काश्मीरच्या मागणीला समर्थन !

फारुख अब्दुल्ला एकापाठोपाठ एक देशद्रोही विधाने करत आहेत
आणि केंद्र सरकार याविषयी गप्प आहे ! अशामुळे काश्मीरची समस्या
सुटण्याऐवजी अधिक स्फोटक होत जाईल, हे सरकारला कधी कळणार ?
        नवी देहली - मी हुरियत कॉन्फरन्सच्या विरोधात नाही. काश्मिरी जनतेच्या अधिकारासाठी मी स्वातंत्र्याचे समर्थन करतो, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. आपण जोपर्यंत एकत्रित येणार नाही, तोपर्यंत स्वतंत्र होऊ शकत नाही. मी नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करतो, असेही त्यांनी या वेळी म्हटले. शेख अब्दुल्ला यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त हजरतबल येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
फारुख अब्दुल्ला यांनी केलेली विधाने
१. ही आग आता कधी विझणार नाही. ते (केंद्र सरकार) तुम्हाला काहीच देणार नाहीत. तुम्हाला तुमच्या अधिकारासाठी हा संघर्ष चालूच ठेवावा लागेल. आम्ही या आंदोलनासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे.
२. आम्ही तुमच्या आंदोलनाचा भाग आहोत. आम्हाला विरोधी समजू नका. आम्ही जिहादची लढाई लढली आहे. संघटित रहा आणि हे आंदोलन पुढे घेऊन चला. आम्ही तुमच्या समवेत आहोत. जोपर्यंत तुम्ही योग्य मार्गावरून चालला आहात, तोपर्यंत आम्ही तुमच्या समवेत आहोत. केवळ तुम्हीच (हुरियत नेते) या राज्याला योग्य मार्गावरून घेऊन जाऊ शकता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn