Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

साक्षात् श्री दत्तात्रेयांच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी जागृत तीर्थक्षेत्रे

१. माहूर : ता. किनवट, जि. नांदेड, महाराष्ट्र.
२. गिरनार : जुनागडजवळ, सौराष्ट्र. याला १०,००० पायर्‍या आहेत.
३. कारंजा : श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान. लाड-कारंजे हे याचे दुसरे नाव होय. काशीचे ब्रह्मानंद सरस्वती यांनी या स्थानी प्रथम दत्तमंदिर उभारले.
४. औदुंबर : श्री नृसिंह सरस्वतींनी येथे चातुर्मास-निवास केला. हे स्थान महाराष्ट्रातील भिलवडी स्थानकापासून १० कि.मी. अंतरावर कृष्णाकाठी आहे.
५. नरसोबाची वाडी, जिल्हा कोेल्हापूर, महाराष्ट्र 
५ अ. स्थानमाहात्म्य : दुसरे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांचे येथे बारा वर्षे वास्तव्य होते. येथे अष्टतीर्थे अन् दत्त परंपरेतील सात संतांच्या समाध्याही आहेत. येथे कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम आहे. हे टेंबेस्वामींचे प्रेरणास्थान आहे.
५ आ. आध्यात्मिक महत्त्व : येथे श्राद्धादी विधी केल्याने पितरांना सद्गती मिळते. पिशाचबाधेने पीडित लोकांनी येथे साधना केल्यास ते बाधामुक्त होतात, असा अनेकांचा अनुभव आहे. 
६. गाणगापूर : हे पुणे-रायचूर या मार्गावर कर्नाटकात आहे. येथे भीमा आणि अमरजा या नद्यांचा संगम आहे. येथे श्री नृसिंह सरस्वतींनी तेवीस वर्षे वास्तव्य केले आणि येथेच सर्व कार्य केले. येथूनच त्यांनी श्रीशैल्यास प्रयाण केले.
७. कुरवपूर : कर्नाटक. रायचूरहून मोटारीने पल्लदिनीपर्यंत (कुरगुड्डी) जाता येते. पुढे कृष्णेच्या पाण्यात हे बेट आहे. हे श्रीपाद श्रीवल्लभांचे कार्यस्थान होय.
८. पीठापूर : आंध्रप्रदेश. श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान. टेंबेस्वामींनी ते उजेडात आणले.
९. वाराणसी : येथे नारदघाटावर दत्तात्रेय मठ आहे. श्री नृसिंह सरस्वतींचे जे वंशज आजही तेथे आहेत. त्यांचे आडनाव काळे होय. पुढे काळे याचा अपभ्रंश कालिया असा झाला. कालिया नावाची बाग आणि गल्ली आजही तेथे आहे.
१०. श्रीशैल्य : हे ठिकाण हैद्राबादजवळ आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी तेथे गमन केले.
११. भट्टगाव (भडगाव) : हे काठमांडूपासून (नेपाळ) ३५ कि.मी. अंतरावर आहे.
१२. पांचाळेश्‍वर : जिल्हा बीड, महाराष्ट्र.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn