Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

खलीदप्रमाणे आता इशरतच्या कुटुंबालासुद्धा साहाय्य देणार का ? - उद्धव ठाकरे

     मुंबई, १५ डिसेंबर - ज्याप्रमाणे खालीद याला सामान्य नागरिक ठरवून आर्थिक साहाय्याची घोषणा दिली, त्याच न्यायाने गुजरात पोलिसांच्या चकमकीत मारल्या गेलेल्या इशरत जहां किंवा सोहराबुद्दिन यालाही सामान्य नागरिक म्हणून साहाय्य देणार का ?, असा प्रश्‍न शिवसेनाप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारला आहे. 
     यात पुढे म्हटले आहे की, हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी लष्कराच्या चकमकीत ठार झाल्यावर जम्मू-काश्मीरमध्ये ३ मास अस्थिरता निर्माण झाली होती. याच बुरहान वानी याचा भाऊ खालीद वानी १३ एप्रिल २०१५ या दिवशी सुरक्षा जवानांच्या गोळीबारात ठार झाला. सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळबारात किंवा आतंकवादी आक्रमणात खालीद याच्या मृत्यूमुखी पडलेल्या १०६ कुटुंबियांना जम्मू-काश्मीरमधील भाजप-पीपीडी शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला ४ लक्ष रुपये इतके आर्थिक साहाय्य देण्यात आले. त्यामध्ये आतंकवादी बुरहानचा भाऊ खालीद याच्या कुटुंबालाही आर्थिक साहाय्य देण्यात आले. अतिरेकी खालीद वानी याच्या मृत्यूनंतर आर्थिक साहाय्य म्हणजे कश्मीरमध्ये लढणार्‍या जवानांचे मनोबल खच्चीकरण करण्याचाच प्रकार आहे. 

यातील अन्य महत्त्वाची सूत्रे 
१. बुरहान वानी याची हत्या हा पाकिस्तानात काळा दिवस पाळला गेला. हा ज्याप्रमाणे कुणी महात्मा नव्हता, त्याप्रमाणे त्याचा भाऊ खालीद हादेखील कुणी संत-सज्जन देशभक्त नव्हता. एका अतिरेक्याच्या मृत्यूसाठी भाजप आघाडीचे सरकार नुकसानभरपाई देत असेल तर देशाचे कसे व्हायचे ? 
२. मेहबुबा मुफ्ती मुख्यमंत्री असतील, पण भाजप त्या सरकारात तेवढाच हिस्सेदार आहे; मात्र सत्तेत आल्यापासून कश्मीरविषयातील मूळ भूमिकेवर त्यांच्या तोंडास जो बोळा बसला तो काही निघायचे नाव नाही. 
४. हे कृत्य काँग्रेस राजवटीत झाले असते, तर भारतीय जनता पक्षाने ‘उलटी’ भूमिका घेऊन काँग्रेसला पाकिस्तान किंवा अतिरेकी यांचे हस्तक ठरवून देशद्रोही म्हणून जनतेच्या न्यायालयात खटलाच उभा केला असता. 
५. अशा प्रकारचे साहाय्य साधारणपणे आतंकवाद्यांच्या आक्रमणात मरण पावलेल्या निरपराध नागरिकांच्या कुटुंबाना दिले जाते. या ‘मापा’त खालीद वानी कुठेच बसत नाही. त्यामुळे मापात पाप झाले आहे आणि त्या पापात कश्मीरातील भाजप सरकार सहभागी झाले, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. 
६. खालीद हा निरपराधी असल्याचे त्याच्या कुटुंबाचे म्हणणे होते; मात्र लष्कराच्या म्हणण्यानुसार तो हिजबुल मुजाहिद्दीनचा आतंकवादी होता आणि चकमकीदरम्यानच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तब्बल वीस महिन्यांनी खालीदला सामान्य नागरिक ठरवून आर्थिक मदतीची घोषणा होणे धक्कादायक आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn