Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राष्ट्र अन् धर्म यांवर विविध स्तरांवर होत असलेल्या आघातांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांचा कृतीशील आविष्कार !

गोवा राज्याचे नोव्हेंबर २०१६ मधील हिंदु जनजागृती समितीचे प्रसारकार्य 
१. ‘चलो कश्मीर की ओर’ अभियान 
१ अ. उत्तर गोव्यात कृतीप्रवण झालेल्या हिंदूंनी ‘बिलिव्हर्स’च्या प्रार्थनासभांच्या विरोधात संघटितपणे कार्य करण्याचे ठरवणे : ‘म्हापसा येथे झालेल्या ‘एक भारत अभियान - कश्मीर की ओर’ या सभेनंतर कृतीप्रवण झालेल्या हिंदूंनी संघटितपणे कार्य करण्याचे ठरवले आहे. या दृष्टीने म्हापसा येथे चौथी बैठक झाली.
१ आ. तीन ग्रामसभांत काश्मीरमधील विस्थापित हिंदूंच्या पुनर्वसनासंबंधी ठराव पारित ! : पोंबुर्फा, वन-म्हवलिंगे-कुडिचरे आणि पिळगाव या ग्रामपंचायतींमध्ये ‘एक भारत अभियान - कश्मीर की ओर’ याविषयी सांगितल्यानंतर ग्रामसभांत विस्थापित हिंदूंच्या पुनर्वसनासंबंधी ठराव पारित करून घेण्यात आला. त्याचप्रमाणे पेडणे तालुक्यातील सरपंंचांनी ठराव घेणार असल्याचे सांगितले.
२. पुरोगामी श्री. दत्ता नायक यांनी लेखातून ब्राह्मण 
महिलांचा अत्यंत हीन भाषेत अवमान करण्याचे प्रकरण 
२ अ. फोंडा - कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणारे पुरोगामी श्री. दत्ता नायक यांच्या विरोधात तक्रार दाखल ! : दैनिक लोकमतच्या १६.१०.२०१६ च्या अंकातील ‘हॅलो रविवार’ या पुरवणीत लेखक श्री. दत्ता नायक यांनी ‘कोकणस्थ ब्राह्मणांच्या घार्‍या डोळ्यांचे रहस्य’ या शीर्षकाखाली एक लेख लिहिला आहे. यामध्ये ब्राह्मण महिलांचा अत्यंत हीन भाषेत अवमान केला आहे. या लेखामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी फोंडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. या तक्रारीची नोंद घेऊन ‘संबंधितांना बोलावून त्यांची चौकशी करू’, असे पोलिसांनी आश्‍वासन दिले.
२ आ. मडगाव - ‘दक्षिणायन’ परिषदेवर बंदी घालण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी ! : हिंदु जनाजागृती समितीने मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे श्री. दत्ता नायक हे अध्यक्षपद भूषवत असलेल्या आणि मडगाव येथे १८ ते २० नोव्हेंबर २०१६ या काळात होत असलेल्या ‘दक्षिणायन’ परिषदेवर बंदी घालण्याची मागणी केली.
३. सावईवेरे, फोंडा येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला उत्तम प्रतिसाद ! 
३ अ. सरपंच सौ. वैशाली नाईक आणि जिल्हा पंचायत सदस्य श्री. मोहन वेरेकर यांचे सभेसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन ! : २७.११.२०१६ या दिवशी फोंडा तालुक्यातील सावईवेरे येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराच्या नियोजनासाठी सावईवेरे येथील गरुडासन सभागृहात हिंदुत्वनिष्ठांची बैठक झाली. सावईवेरे येथील सरपंच, पंचसदस्य आणि विविध महिला गट यांना संपर्क केले. सर्वांनी ‘मोठ्या संख्येने सभेत सहभागी होऊ’, असे सांगितले. तेथील सरपंच सौ. वैशाली नाईक आणि जिल्हा पंचायत सदस्य श्री. मोहन वेरेकर यांनी ‘सभेसाठी पूर्ण सहकार्य करू’, असे आश्‍वासन दिले. ४ महिला गटांच्या सदस्यांच्या बैठका घेण्यात आल्या.
३ आ. हिंदु धर्माभिमान्यांनी खडसवल्यानंतर ‘बिलिव्हर्स’वाल्यांनी निमूटपणे निघून जाणे ! : सावईवेरेे येथे धर्मजागृती सभेचा प्रसार चालू असतांना ख्रिस्ती ‘बिलिव्हर्स’ आणि हिंदु धर्माभिमानी समोरासमोर आले. हिंदूंच्या वस्तीत ख्रिस्त्यांचा प्रसार करणार्‍या या ‘बिलिव्हर्स’वाल्यांना हिंदु धर्माभिमान्यांनी चांगलेच खडसवले. त्यानंतर हे ‘बिलिव्हर्स’वाले तेथून निमूटपणे निघून गेले.
४. अन्य कार्यातील हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
४ अ. पणजी येथील ‘निर्धार मेळाव्या’त हिंदु जनजागृती समितीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद ! : मराठी राजभाषा समिती, गोवा यांच्याकडून पणजी येथील श्री. हेडगेवार पटांगणावर १३.११.२०१६ या दिवशी ‘निर्धार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात समितीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. समितीचे श्री. जयेश थळी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सनातनच्या वतीने प्रकाशित केलेल्या मराठी भाषाविषयक ग्रंथांची ओळख करून दिली. सभेच्या ठिकाणी ग्रंथांचा कक्ष लावण्यात आला होता. याला चांगला प्रतिसाद मिळाला. 
४ आ. मडगाव येथे धर्मांधांनी टिपू सुलतान जयंती साजरी करण्याचा घाट घालणे आणि हिंदुत्वनिष्ठांनी त्याला संघटितपणे विरोध करणे
४ आ १. अवैधपणे फलक लावणार्‍या धर्मांधांच्या विरोधात तक्रार करून हिंदुत्वनिष्ठांनी प्रशासनाला फलक काढण्यास भाग पाडणे : २०.११.२०१६ या दिवशी मडगाव येथे काही धर्मांधांनी टिपू सुलतान जयंती साजरी करण्याचा घाट घातला. या संदर्भात ठिकठिकाणी अवैधपणे फलक लावण्यात आले होते. स्थानिक ‘शिवसाम्राज्य संघटने’च्या हिंदूंनी या अवैध फलकांच्या विरोधात तक्रार करून प्रशासनाला हे फलक काढण्यास भाग पाडले. 
४ आ २. अवैधपणे लावलेल्या फलकांच्या घटनेसंदर्भात प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन देणे : ‘अनधिकृत फलक लावून धार्मिक तणाव निर्माण करणार्‍या या धर्मांधांवर कारवाई करावी’ या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. या वेळी शिवसेना, शिवसाम्राज्य संघटना, म्हापसा व्यापारी संघटना, गोमंतक मंदिर अन् धार्मिक संस्था महासंघ, हिंदु जनजागृती समिती आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. ‘मडगाव येथे धर्मांधांनी टिपू सुलतान जयंती साजरी करण्याच्या उद्देशाने अवैधपणे फलक लावून धार्मिक तणाव निर्माण झालेल्या घडामोडीनंतर प्रशासनाने अहवाल बनवला आहे. हा अहवाल उपजिल्हाधिकारी यांना पाठवून योग्य ती कारवाई करण्यास सांगितले जाणार आहे’, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी श्री. स्वप्नील नाईक यांनी दिले. 
४ आ ३. धर्मांधांच्या वाहनांना आग लावण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या हिंदु युवकाला अनेक हिंदु संघटना आणि २०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ यांचे समर्थन ! : हे सर्व घडल्यानंतर काही धर्मांधांच्या वाहनांना अचानक आग लागली आणि त्याचा आळ शिवसाम्राज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांवर घालण्यात आला. पोलिसांनी या संघटनेच्या एका कार्यकर्त्याला अटकही केली. शिवसेना आणि इतर हिंदुत्वनिष्ठांनी संघटित होेऊन या घटनेचा निषेध केला अन् हिंदु युवकाचा छळ थांबवण्याची मागणी केली. या वेळी पोलिसांना निवेदन देतांना शिवसेना सहराज्य प्रमुख श्री. शिवप्रसाद जोशी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयेश थळी उपस्थित होते. यानंतर २०.११.२०१६ या दिवशी शिवसेना, शिवसाम्राज्य संघटना, म्हापसा व्यापारी संघटना, गोमंतक मंदिर अन् धार्मिक संस्था महासंघ, हिंदु जनजागृती समिती आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ मिळून एकूण २०० हून अधिक हिंदूंनी मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मडकईकर यांची भेट घेतली आणि हिंदु युवकांची चौकशी थांबवण्याची मागणी केली. 
४ इ. हिंदुत्वनिष्ठांनी संघटितपणे केलेल्या मागणीनंतर मोती डोंगरावरील मशिदींमधूून वाजवल्या जाणार्‍या भोंग्यांचा आवाज न्यून होणे : मुंबई येथील अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या मशिदींवरील भोंग्यांना अनुसरून होणार्‍या ध्वनीप्रदूषणावर आळा घालण्यासाठी न्यायालयीन निर्णयाचे पालन करण्यासंबंधी आणि मोतीडोंगर, मडगाव येथील अनधिकृत झोपडपट्टी हटवण्यासाठी केलेल्या याचिकेची दाखल घेऊन धर्मांधांचे आश्रयस्थान बनलेल्या या झोपडपट्टीवर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. याचा परिणाम म्हणजे दुसर्‍या दिवसापासून मोती डोंगरावरील मशिदींमधूून वाजवल्या जाणार्‍या भोंग्यांचा आवाज न्यून झाला.’
- श्री. गोविंद चोडणकर आणि सौ. राजश्री गडेकर, गोवा (७.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn