Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देशभरातून मोठ्या प्रमाणात नव्या नोटांसहित बेहिशोबी रोकड जप्त !

     चेन्नई - आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी गेल्या दोन दिवसांत देशभरातील विविध ठिकाणांवरून बेहिशोबी पैसे जप्त केले आहेत. यात नव्या नोटांचाही समावेश आहे.
१. चेन्नईमध्ये नव्या नोटा असलेली २४ कोटी रुपयांची रक्कम १० डिसेंबरला जप्त करण्यात आली. वेल्लोरमधील एका चारचाकीमधून २ सहस्र रुपयांच्या नव्या नोटा असलेली रक्कम जप्त करण्यात आली.
२. कर्नाटकमधील चल्लाकेरे येथे एका न्हाणीघरातून नव्या नोटा असलेली ५ कोटी ७० लाख रुपयांची रोख रक्कम, ३२ किलो सोन्याची बिस्किटे आणि दागिने, ९० लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत.
३. भाग्यनगरजवळील कोथूर येथून ८२ लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये ७१ लाख रुपयांच्या नव्या २ सहस्र रुपयांच्या आणि ११ लाख रुपयांच्या १०० रुपयांच्या नोटा आहेत. कमिशन घेऊन नोटाबदलीचा व्यवहार करणार्‍या दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे.
४. भाग्यनगरमधील अन्य एका घटनेत टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक के. सुधीर बाबू यांच्यावर ६५ लाख रुपयांचे कमिशन घेण्यात आल्यामुळे कारवाई करण्यात आली. ३ कोटी ७५ लाख रुपयांच्या नोटा पालटून देण्यासाठी हे कमिशन घेण्यात आले होते.
५. देहलीच्या ग्रेटर कैलाश १ परिसरात अधिवक्ता रोहित टंडन यांच्या कार्यालयावर टाकण्यात आलेल्या धाडीत १३ कोटी ५६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यात अडीच कोटी रुपयांच्या नव्या नोटांचाही समावेश आहे. त्यांनी गेल्या महिन्यात १२८ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता घोषित केली होती. या घटनेनंतर रोहित टंडन फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn