Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राष्ट्ररक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे सिद्ध व्हा ! - कु. प्रतीक्षा कोरगावकर, महाराष्ट्र राज्य संघटक, रणरागिणी

डावीकडून सौ. कल्पना देशपांडे, दीपप्रज्वलन करतांना
ह.भ.प. छत्रगुण महाराज आणि कु. प्रतीक्षा कोरगावकर
धर्मासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा डायगव्हाणवासियांचा (संभाजीनगर) निर्धार !
    डायगव्हाण (संभाजीनगर) - धर्महानीसमवेत सामाजिक दुष्प्रवृत्तींना रोखणे ही काळाची आवश्यकता झाली आहे. त्यासाठीच आता आपण संघटित होऊन भ्रष्टाचारासारख्या इतरही सर्व सामाजिक दुष्प्रवृतींना रोखण्यासाठी कटीबद्ध झाले पाहिजे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती, हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या, गोहत्या, धर्मांतर यांसारखे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्र स्थापण्याविना दुसरा पर्याय नाही. यासाठीच आता हिंदूंनी राष्ट्ररक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे सिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन रणारागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले. कु. प्रतीक्षा कोरगावकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘डायगव्हाण गावातील प्रत्येक युवक हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आता कटीबद्ध होईल’, असा निर्धार येथील युवकांनी डायगव्हाण येथे ११ डिसेंबर या दिवशी पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतर केला.     ह.भ.प. छत्रगुण महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी ह.भ.प. छत्रगुण महाराज आणि रणरागिणी शाखेच्या सौ. कल्पना देशपांडे यांनीही मार्गदर्शन केले. या सभेला ३२५ हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
महिलांनी स्वरक्षणार्थ सिद्ध होणे आवश्यक ! - सौ. कल्पना देशपांडे, रणरागिणी
     शौर्याची आणि तेजस्वी पराक्रमांची परंपरा असलेल्या हिंदूंची सद्यस्थिती विदारक आहे. महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. या स्थितीत आता महिलांनीच स्वरक्षणार्थ सिद्ध व्हायला हवे. त्यासाठीच आज सर्वांनी स्वसंरक्षण विद्या शिकणे आवश्यक आहे. यासाठीच हिंदु जनजागृती समितीप्रणित महिला शाखा रणरागिणीच्या माध्यमातून हिंदु महिलांना, युवतींना विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जातेे.
क्षणचित्रे
  • कडाक्याची थंडी असूनही ग्रामस्थ मोठ्या संख्येने सभेस उपस्थित होते. यात महिलांचा सहभाग उत्स्फूर्त होता.
  • पिंपरीराजा आणि घारेगाव या दोन गावांत समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गातील ९ धर्मप्रेमी युवकांनी याा सभेच्या आयोजनात तसेच प्रसारात सक्रीय सहभाग घेतला.
  • गावातील युवकांनीही स्वत: पुढाकार घेऊन या सभेच्या आयोजनात सहभाग घेतला, तसेच सभेच्या प्रसारासाठी गावात आदल्या दिवशी पदफेरीही काढली.
‘३१ डिसेंबरला नवीन वर्ष साजरे न करता धर्मरक्षण करा !’ 
या आवाहनास युवकांचा प्रतिसाद !
     ३१ डिसेंबरला एका दिवसासाठी ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित होण्याऐवजी गावातील सर्वांचे प्रबोधन करून धर्मरक्षण करा, असे आवाहन कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी या वेळी उपस्थितांना केले. गावातील युवकांनी या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला.
     सभेनंतर वक्त्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत येत्या ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री कोणीही नववर्ष साजरे करू नये, यासाठी गावातील सर्वांचे प्रबोधन व्हावे, या हेतूने ३० डिसेंबरला एका प्रबोधन फेरीचे गावात आयोजन करण्याचा निश्‍चय करण्यात आला.
कार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी १५ डिसेंबरला सायंकाळी ७.३० वाजता एका आढावा बैठकीचे 
आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन सर्व ग्रामस्थांना करण्यात आले आहे.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn