Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

लोभस, सहनशील आणि सात्त्विक गोष्टींची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नागपूर येथील चि. अभिराम आशिष क्षीरसागर (वय १ वर्ष) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन
धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अभिराम क्षीरसागर एक दैवी बालक आहे !
चि. अभिराम क्षीरसागर
     ‘मार्गशीर्ष कृष्ण पक्ष पंचमी म्हणजे १८.१२.२०१६ या दिवशी नागपूर येथील चि. अभिराम आशिष क्षीरसागर याचा तिथीनुसार पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याची आई सौ. नेहा आशिष क्षीरसागर आणि आत्या कु. अंजली क्षीरसागर यांना त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
१. सौ. नेहा आशिष क्षीरसागर (चि. अभिरामची आई), नागपूर
१ अ. गर्भधारणेनंतर 
१ अ १. कोल्हापूरला श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनाला जाण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होणे : ‘मला दिवस गेल्यानंतर ‘कोल्हापूरला श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनाला जावे’, असा विचार माझ्या मनात तीव्रतेने आणि सातत्याने येत होता; पण काही अडचणींमुळे मला तेथे जाणे शक्य झाले नाही. नंतर सहाव्या मासात (महिन्यात) शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला गेल्यावर मला थोडे बरे वाटले. बाळाचा (चि. अभिरामचा) जन्म झाल्यावर हा विचार थांबला. 
१ अ २. गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाच्या दर्शनाला जावेसे वाटणे : माझ्या माहेरी गोकुळाष्टमी प्रत्येक वर्षी साजरी केली जाते. त्या वेळीही ‘श्रीकृष्णाच्या दर्शनाला जावे’, असे मला सतत वाटत होते. त्यापूर्वी कधी ‘माहेरी गोकुळाष्टमीला जावे’, असे मला वाटले नव्हते आणि या वेळी माहेरी जाणे शक्य नसल्याने मी सासरी श्रीकृष्णाची पूजा अन् गोपाळकाला केला. तेव्हा मला बरे वाटले. 
१ अ ३. यजमान उपनिषदांतील मंत्र म्हणतांना बाळाने प्रतिसाद दिल्याचे जाणवणे : माझे यजमान पौरोहित्य करतात. त्यामुळे ते प्रतिदिन पोटावर हात ठेवून उपनिषदांतील मंत्र म्हणायचे. त्या वेळी मला ‘बाळ सर्व मंत्र एकाग्रतेने ऐकत आहे’, असे जाणवायचे. दिवसभर बाळाची हालचाल जाणवत नसे; पण मंत्रपठण ऐकतांना मला ‘बाळ प्रतिसाद देत आहे’, असे जाणवत होते.
१ अ ४. देवीकवच, रामरक्षा, मारुतिस्तोत्र आणि ॐकार म्हणतांना बाळ एकाग्रतेने ऐकत असल्याचे जाणवणे : मला सासूबाईंनी प्रतिदिन देवीकवच म्हणायला सांगितले होते. तसेच मी ‘बाळावर संस्कार कसे करावेत ?’, या संदर्भातील ध्वनीचित्र-चकतीमध्ये (सीडीमध्ये) ‘प्रतिदिन ॐकार, रामरक्षा, मारुतिस्तोत्र आणि पसायदान म्हणायचे’, असे पाहिले होते. हे सर्व करतांना बाळ नेहमीच ‘एकाग्रतेने सर्व ऐकत आहे’, असे मला जाणवायचे.
१ आ. जन्मानंतर
     बाळाने बारशाच्या दिवशी विधीच्या वेळी दोन घंटे (तास) काहीही चुळबूळ न करता मंत्र एकाग्रतेने ऐकणे : बाळ (अभिराम) दीड मासाचा झाल्यावर आम्ही शास्त्रानुसार विधी करून त्याचे बारसे केले. त्या दिवशीही तो संपूर्ण विधी होईपर्यंत जागा होता. त्याने सर्व मंत्र पूर्ण एकाग्रतेने ऐकले. त्याने दोन घंटे काहीही चुळबूळ केली नाही आणि तो एकदाही रडला नाही.’
२. कु. अंजली क्षीरसागर (चि. अभिरामची आत्या), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. लोभस
     चि. अभिराम लोभस आहे. तो इतरांना पटकन आकर्षित करून घेतो. अनोळखी व्यक्तीही त्याच्याकडे पटकन आकर्षित होतात. प्रवासात आणि अन्यत्र भेटलेल्या ३ ते ४ अनोळखी व्यक्तींनी ‘या बालकात काहीतरी दैवी आहे’, असे सांगितले.
२ आ. सहनशील
    चि. अभिरामची सहनशक्ती चांगली आहे. लहानपणी त्याचे कान टोचले होते. तसेच त्याला विविध ‘इंजेक्शन’ (बाळांना नित्य देण्यात येणारे) दिले जायचे, त्या वेळी तो रडत नसे. तसेच ताप आल्यावरही त्याने चिडचिड केली अथवा तो रडला, असे कधी झाले नाही. इतर लहान बालकांच्या तुलनेत तो पुष्कळ शांत आहे.’ 
२ इ. अनुकरणप्रिय
     आम्ही अभिरामला घेऊन एका मंदिरात गेलो होतो. त्या वेळी आम्ही सर्वांनी देवासमोर डोके टेकवून नमस्कार केला. नंतर आजोबांनी अभिरामला ‘जय बाप्पा कर’, असे सांगताच अभिरामनेही लगेचच देवासमोर डोके टेकवून नमस्कार केला. एरव्ही घरी आलेल्यांच्या कृतीही तो लगेच आत्मसात करून तसे प्रयत्न करतो.
२ ई. सात्त्विक गोष्टींची आवड असणे 
१. अभिराम १ - २ मासांचा असतांना काही कारणास्तव रडला, तर आम्ही त्याच्यासमोर ‘कृष्ण, कन्हैया रे, चला होळी खेळूया’ हे भक्तीगीत लावायचो अथवा म्हणायचो. त्यानंतर तो रडणे लगेच बंद करत असे. 
२. आजीने प्रतिदिन देवपूजा करतांना घंटा वाजवायला आरंभ केल्यावर तो जिथे कुठे असेल, तेथून तो रांगत देवघरात येतो.
३. चि. अभिरामला घेऊन श्रीरामरक्षा, श्री रेणुकादेवीची आरती अथवा भजने म्हटल्यास तो ते शांतपणे लक्ष देऊन ऐकतो.
२ उ. सूक्ष्मातील कळणे 
२ उ १. तो सात्त्विक व्यक्तींकडे, तसेच चांगला आध्यात्मिक स्तर असलेल्या आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांकडे पटकन जातो.
२ उ २. आजोबांनी घरात सनातनचा आकाशकंदिल लावल्यावर त्याने तो आनंदाने इतरांना दाखवणे : आम्ही दिवाळीत घराबाहेर लावलेला सनातनचा आकाशकंदिल दिवाळी संपल्यानंतर घरात आणून लावला. त्याचे आजोबा आकाशकंदिल घरात लावतांना पाहून चि. अभिरामला पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी आजी तेथे येताच आजी आणि तिथे असणार्‍या एका काकूंनाही तो हात वर करून आकाशकंदिल परत परत दाखवून आनंद व्यक्त करत होता. घरात झुंबरही लावलेले आहे; परंतु ते कधी अभिरामने अशा पद्धतीने दाखवले नाही.’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn