Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

लहानपणापासूनच आश्रमजीवनाची ओढ असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेेली कु. योगिनी वैभव आफळे (वय १५ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे
हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. योगिनी ही एक आहे !
(‘वर्ष २०१० मध्ये योगिनीची आध्यात्मिक पातळी ५२ टक्के होती.’ - संकलक)
     रामनाथी आश्रमात रहाणारी कु. योगिनी वैभव आफळे हिचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष अष्टमी (२१.१२.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
कु. योगिनी आफळे
कु. योगिनी वैभव आफळे हिला वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
    हे भगवंता, श्रीविष्णुस्वरूप गुरुराया, तुम्हीच घडवलेले या बालिकेतील (कु. योगिनीतील) आमूलाग्र पालट तुमच्या चरणी स्थुलातून कृतज्ञतापूर्वक अर्पण करत आहोत. तिच्यावर संस्कार करणे अथवा तिला काही शिकवणे, हे आमच्या हातात नाही. तिच्या जीवनात जे काही घडत आहे, ते तुमच्याच कृपाशीर्वादाने. तिच्यातील स्वभावदोष आणि अहं नष्ट होऊन तिला तुमच्या चरणी विलीन होण्यासाठी तुम्हीच सामर्थ्य द्या. आज तिच्या पंधराव्या वाढदिवसानिमित्त तुम्ही आम्हावर केलेल्या कृपेचा वर्षाव शब्दांत व्यक्त करण्याचा हा अल्पसा प्रयत्न !
कु. योगिनी हिने संगणकावर सिद्ध केलेले एक भावचित्र
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. आश्रमजीवनाची ओढ : ‘आम्ही दोघेही साधना करत असल्याने कु. योगिनीवर जन्मापासूनच सत्संग आणि सेवा यांचा संस्कार झाला. त्यामुळे तिला लहानपणापासूनच आश्रमजीवनाची ओढ लागली. ती १ वर्षाची असतांना तिचे आजी-आजोबा (श्री. आणि सौ. गोरे) देवद येथील सनातनच्या आश्रमाशेजारी रहाण्यास आले. तेव्हापासून ती आश्रमात जाऊ लागली. ती इयत्ता सहावीत असतांना आश्रमात पूर्णवेळ रहाण्यासाठी गेली. नंतर ६ मासांनी तिच्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे तिला व्यष्टी साधना करण्यास सांगितले होते. ती घरी आल्यानंतरही तिचा आश्रमात जाण्याचा निश्‍चय कायम असतो.
१ आ. वडिलांना भेटण्याचा हट्ट न करणे : योगिनी अडीच वर्षांची असल्यापासून तिचे बाबा पूर्णवेळ सेवा करण्यासाठी ठाणे सेवाकेंद्रात, नंतर ७ वर्षे झारखंड आणि सध्या गुजरात येथे असतात. झारखंड येथे असतांना योगिनीचे बाबा तिला ६ मासांनी भेटत. तेव्हा तिने कधीही ‘बाबांना भेटायचे आहे’, असा हट्ट केला नाही. आताही ‘बाबांनी सेवारत असावे’, असे तिला वाटते.
१ इ. शालेय जीवन
१ इ १. शाळेत ६ मासांत शिकवलेला अभ्यास केवळ ४ दिवसांत करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे : ती इयत्ता सहावीत असतांना रुग्णाईत असल्यामुळे वार्षिक परीक्षेच्या केवळ ४ दिवस आधी ती शाळेत जाऊ शकली. ‘तिची शाळा बुडल्याने तिचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये’, असे आम्हाला वाटत होते; म्हणून आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना विनंती केली. त्यांनी तिला परीक्षेला बसण्याची अनुमती दिली. केवळ आमच्या आग्रहाखातर योगिनीने सहावीची वार्षिक परीक्षा देण्याची सिद्धता केली. तिला केवळ चार दिवसांत शाळेत ६ मासांत शिकवलेला अभ्यास करायचा होता. देवानेच तिच्याकडून अभ्यास करून घेतला आणि चांगले गुण मिळवून ती पुढील वर्गात जाऊ शकली. पुढे तिने २ वर्षे शिक्षण घेतले. त्या वेळी ती शाळा सुटल्यावर सेवेसाठी आश्रमात जात असे.
१ इ २. शिक्षकांना योगिनीचे वेगळेपण जाणवणे : सातवीनंतर योगिनी मुलींच्या एका शाळेत जाऊ लागली. तेथील एका शिक्षकांनी योगिनीचा पितृवत् सांभाळ केला; म्हणून ते वर्ष सरले. आम्ही त्यांना योगिनीच्या आध्यात्मिक शिक्षणाच्या आवडीविषयी सांगायचो. तेव्हा ते म्हणत, ‘‘ती अध्यात्मात मोठी होईल.’’ नंतर आम्ही शिक्षकांना ‘योगिनी गोव्याला आश्रमात गेली आहे’, असे सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘मी नववीच्या वर्गात गेल्यावर योगिनीला शोधत असतो. तिच्यामुळे वर्गातील अन्य मुलींना लाभ झाला असता.’’
१ ई. साधनेची तळमळ असल्याने आश्रमात एकटीने रहाण्यास सिद्ध होणे : ती आठवीत असतांना सुटीत रामनाथी आश्रमात गेली होती. त्या वेळी तिने तेथेच रहाण्याची इच्छा प्रदर्शित केली. एकटीने रहाण्याचीही तिची सिद्धता होती. आज देवाच्या कृपेने ती रामनाथी आश्रमात राहून सेवा करत आहे. यासाठी आम्ही ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो. देव तिची घेत असलेली काळजी आणि योगिनीचा दृढनिश्‍चय यांमुळेच हे घडले आहे.
१ उ. कुटुंबियांना स्थिर रहाण्यासाठी साहाय्य करणे : योगिनी सर्व परिस्थिती सहजतेने स्वीकारते. कुटुंबियांपैकी कुणी अस्थिर झाले, तर ती ‘‘आपण साधक आहोत. प.पू. डॉक्टरांना हे आवडणार नाही. हे आपले प्रारब्धच असेल. तुम्ही शांत रहा. भावाच्या स्तरावर प्रयत्न करा’’, असे सांगून ‘परिस्थितीतून साधना घडावी’, याचे स्मरण करून देते.
१ ऊ. सहनशील : आध्यात्मिक त्रासामुळे काही वेळा योगिनीचे पोट आणि पाय दुखतात, तसेच तिला अन्य शारीरिक त्रासही होतात. हे त्रास ती सहन करते. याविषयी ती काही सांगत नाही अथवा तक्रारही करत नाही. ‘ती शांत असली की, तिला कुठेतरी दुखत असावे’, हे आम्हाला समजते.
१ ए. नवीन गोष्टी शिकण्याची आवड
१. योगिनी इयत्ता तिसरीत असतांना स्वतःहून मोठी सायकल चालवू लागली.
२. योगिनीला लहानपणापासून संस्कृत शिकण्याची आवड आहे. तिने लहानपणी पाठ केलेले भगवद्गीतेचे अध्याय आताही तिला पाठ आहेत.
१ ऐ. कलागुण
१ ऐ १. पेटीवर (हार्मोनियमवर) भजने आणि गाणी वाजवणे : तिच्या शिक्षकांनी सांगितले, ‘‘तिचा आवाज चांगला आहे.’’ एकदा आश्रमातून आणलेली पेटी (हार्मोनियम) तिच्यासमोर ठेवल्यावर ती सराईतपणे वाजवू लागली. भजनांच्या नोटेशनचे पुस्तक वाचून ती भजने आणि गाणी वाजवू लागली.
१ ऐ २. प्रदर्शनात पाहिलेले कागदी दागिने घरी स्वतः करणे : योगिनीने एका प्रदर्शनात कागदी दागिने पाहिले. तिने घरी तसे दागिने स्वत:च प्रयोग करून बनवले. ते अगदी व्यावसायिक दागिन्यांसारखे झाले.
१ ऐ ३. नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड : तिला शिक्षणात विशेष रूची नव्हती. तेव्हा मला तिची काळजी वाटायची. आता मात्र ती नवनवीन गोष्टी शिकते. देवाच्याच कृपेने ती चित्रकला, हस्तकला, पाककला, संगणक आदी क्षेत्रांतील गोष्टी चिकाटीने शिकते. तिने फोटोशॉप प्रणालीत बरीच भावचित्रे सिद्ध केली आहेत.
१ ओ. प.पू. पांडे महाराजांनी योगिनीने केलेल्या सेवेचे कौतुक करणे : एकदा मी प.पू. पांडे महाराज (प.पू. बाबा) यांनी जमवलेले वैशिष्ट्यपूर्ण आकार असणारे दगडांचे वर्गीकरण करून ते संग्रह करण्याची सेवा करत होते. प.पू. बाबा मला दगडांवर आकार दाखवत. ते पाहून योगिनीलाही तसे आकार दिसू लागले आणि तीही नवीन दगडावरील आकार दाखवू लागली. तिने दगडांना दिलेली नावे आणि क्रमांक यांप्रमाणे त्यांचे वर्गीकरण करून ते खोेक्यात व्यवस्थित ठेवले. त्या वेळी प.पू. पांडे महाराजांनी तिचे कौतुक केले.’
- सौ. गौरी वैभव आफळे (योगिनीची आई) (१५.१२.२०१६)
१ औ. योगिनीने रामनाथी आश्रमात रहाण्याचे ठरवल्यावर ‘ती आता स्वगृही जात आहे’, असे वाटणे : ‘आम्ही दोघे पूर्णवेळ साधना करण्याविषयी ठरवत असतांना आम्हाला योगिनीची काळजी वाटत होती. त्या वेळी ती केवळ २ वर्षांची होती. तेव्हा एका संतांनी आम्हाला आध्यात्मिक भाग सांगून ‘‘देव तिची काळजी घेईल आणि योग्य वेळी योग्य ते होईल’’, असे सांगितले होते. योगिनीने रामनाथी आश्रमात रहाण्याचे ठरवल्यावर ‘देवाने योगिनीचा सांभाळ करण्यासाठी तिला आमच्याकडे ठेवले होते आणि आता ती स्वगृही जात आहे’, असे मला वाटले अन् संतांनी केलेले मार्गदर्शन आठवून कृतज्ञता वाटली.
देवा तुझे लेकरू आले तुझ्याकडे ।
धाडलेस या जिवाला । करण्यास साधना ।
दिलेस दायित्व तू आम्हा । पहाण्यास या जिवाची ईश्‍वरी आराधना ॥ १ ॥
देवा, तुझे लेकरू आले तुझ्याकडे । होतेच संस्कार देवाचे ।
आध्यात्मिक त्रासही तीव्र होते । देवाने तारले या जिवाला ।
करण्या तीव्र साधना ॥ २ ॥
दिलेस गुण या जिवाला । दिलेस स्वभावदोष आणि अहं निर्मूलन ।
करण्यास प्रक्रियेचे साधन । आणि भावजागृतीचे बळही ॥ ३ ॥
देवा, तुझे लेकरू आले तुझ्याकडे । नेशील तुझ्या चरणकमली ।
असो ही दृढ श्रद्धा आमुची हीच प्रार्थना तव चरणी ॥ ४ ॥’
- श्री. वैभव आफळे (योगिनीचे बाबा) (१५.१२.२०१६)
२. योगिनीतील स्वभावदोष
     ‘एकलकोंडेपणा, इतरांमध्ये न मिसळणे, मनमोकळेपणाने न बोलणे, भिडस्तपणा, न्यूनगंड, आळस आणि उद्धटपणे बोलणे.’
- सौ. गौरी आफळे (१५.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn