Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अमेरिकेत हिजाब परिधान केलेल्या महिला पोलिसाला ‘इसिस’ असे संबोधले !

अमेरिकेतील आतंकवादी आक्रमणानंतर तेथे मुसलमानांच्या 
विरोधात वातावरण निर्माण होत असून अशा घटना त्याचेच द्योतक आहे ! 
उदारमतवादी आणि सुधारणावादी समाजातही मुसलमानविरोधी वातावरण का 
निर्माण होत आहे, याचे उत्तर भारतातील धर्मनिरपेक्षतावाल्यांनी शोधणे आवश्यक ! 
     न्यूयॉर्क - हिजाब परिधान केलेल्या एल्म एल्सोकेरी नामक मुसलमान पोलीस महिलेला ३० वर्षांच्या एका श्‍वेतवर्णीय व्यक्तीने ‘‘इसिस’, मी तुझा गळा कापीन, तुझ्या देशात परत जा’’, असे म्हटले. त्यानंतर तिच्या १६ वर्षांच्या मुलाला मारहाणही केली. त्यानंतर ती व्यक्ती तेथून पळून गेली. पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. वर्ष २०१४ मध्ये एल्सोकेरी यांना आग लागलेल्या एका इमारतीत घुसून एका वयस्कर व्यक्तीचा आणि लहान मुलीचा जीव वाचवल्यासाठी पदक मिळाले होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn