Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सदस्यपदी भाजपचे सुभाष वोरा आणि शिवसेनेचे शिवाजी जाधव यांची निवड !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्षपदाची अद्यापही नियुक्ती नाही ! 
     कोल्हापूर, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी भाजपचे ज्येष्ठ नेते सर्वश्री सुभाष वोरा आणि शिवसेनेचे कोल्हापूर दक्षिण शहरप्रमुख शिवाजी जाधव यांची निवड झाली. विधी आणि न्याय खात्याने या निवडीचा आदेश २९ नोव्हेंबरला दिला. देवस्थान समितीच्या सदस्यपदी सदस्यांची निवड होत असली, तरी गेल्या ६ वर्षांपासून अध्यक्षपदी एकाचीही निवड झाली नाही. त्यामुळे अध्यक्षपद निवडीचेे भिजत घोंगडे किती दिवस ठेवणार, असा प्रश्‍न भक्तांमधून उपस्थित केला जात आहे. 

     विधी आणि न्याय खात्याच्या आदेशानुसार प्रमोद पाटील, बसगोंडा पाटील आणि सौ. संगीता खाडे यांचे सदस्यपद कायम ठेवण्यात आले आहे. समितीचे माजी अध्यक्ष आणि अधिवक्ता गुलाबराव घोरपडे यांच्याकडे १० वर्षे अध्यक्षपद होते. त्यांची मुदत १४ जून २०१० या दिवशी संपली आहे. तेव्हापासून आजतागायत हे पद रिक्त आहे. (महत्त्वाचे पद ६ वर्षे रिक्त ठेवणारी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, देवस्थापनाचा कार्यभार कसा करत असेल, याची कल्पना येते. - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn