Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पादत्राणांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे आणि मुसलमानांची अक्षरे छापण्यावर आळा घाला ! - उच्च न्यायालय

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? शासनाने हे स्वतः करणे अपेक्षित आहे !
      मुसलमानांच्या श्रद्धा दुखावल्याच्या प्रकरणी पोलीस तत्परतेने न्यायालयात अहवाल देतात. पोलिसांनी हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे रेखाटणारे म.फि. हुसेन यांच्यावर देशभरात १ सहस्र २५० हून अधिक तक्रारी प्रविष्ट होऊनही काहीच कारवाई केली नाही. यावरून बहुसंख्य हिंदूंची देशात काय पत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे हिंदूहित साधणार्‍या हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !
     मुंबई, ३ डिसेंबर (वार्ता.) - पादत्राणांवर हिंदूंच्या देवता आणि मुसलमानांची अक्षरे छापली जातात. अशा प्रकरणात पोलिसांनी योग्य तो शोध घेऊन अन्वेषण करावे. जेणेकरून धार्मिक तेढ निर्माण होण्याआधीच अशा प्रकारांना आळा घालता येईल. यापुढे अशा प्रकरणात तज्ञांचा सल्ला घेऊन प्रकरणे हाताळावीत. पादत्राणांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे, मुसलमानांची अक्षरे छापण्यावर आळा घाला, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. वर्ष २०१४ मध्ये ठाणे येथे घडलेल्या एका प्रकरणाच्या सुनावणीवर अंतिम निकाल देतांना न्यायालयाने हा आदेश दिला.
     ठाणे येथील मोक्ष फुटवेअर रिटेलर नावाच्या एका आस्थापनाने पादत्राणाच्या सोलच्या खाली एम्, असे इंग्रजी अक्षर लिहिले होते. हे अक्षर अल्लाह किंवा मुस्लिम यांना उद्देशून असल्याची तक्रार एका व्यक्तीने नौपाडा पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीच्या विरोधात नौपाडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करून मोक्ष फुटवेअरचे मालक, आणि देहली येथील पादत्राणांचा सोल बनवणारा यांना अटक करून सर्व माल कह्यात घेतला. यामध्ये पादत्राणे सिद्ध करणारा आणि त्याचे कारागीर मुसलमान होते. अनेक मुसलमानांनी हा सोल असलेली पादत्राणे घेतली होती. त्यामुळे मोक्ष फुटवेअरचे मालक देजू शहा यांनी जाणीवपूर्वक हा प्रकार केला नसून यात कोणत्याही धर्माचा-जातीचा अवमान होईल, असे काहीच आक्षेपार्ह नाही, असा उर्दू भाषातज्ञांचा अहवाल नौपाडा पोलिसांना दिला. त्यामुळे अंतिम सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील एफ्आयआर् रहित ठरवली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn