Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक २०१६ हे विधेयक एकमताने विधानसभेत संमत !

विधानसभा...
     नागपूर - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक २०१६ हे विधेयक ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत एकमताने समंत करण्यात आले. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले. या विधेयकामुळे राज्याच्या उच्च शिक्षणाला अधिक गती मिळणार आहे आणि संपूर्ण देशात महाराष्ट्र अग्रेसर राज्य म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्‍वास श्री. विनोद तावडे यांनी या वेळी व्यक्त केला. राज्य शासनाने डॉ. अनिल काकोडकर समिती, डॉ. अरुण निगवेकर समिती आणि डॉ. राम ताकवले समिती अशा तीन समित्या उच्चशिक्षण विषयक शिफारसी करण्याकरिता २०१०-२०११ मध्ये नियुक्त केल्या होत्या.
     या तीनही समित्यांनी परस्परपूरक काम केले असून उचित शिफारसी केल्या आहेत, असे या वेळी सांगण्यात आले.
प्रस्तावित सार्वजनिक विद्यापीठ कायद्याची ठळक वैशिष्ट्ये !
१. विद्यार्थीकेंद्रीत रचना आणि त्यांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग
२. महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका पुन्हा चालू होणार
३. पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धती लागू होणार
४. परिणामकारक तक्रार निवारण व्यवस्था५. शिक्षण क्षेत्रातील अनिष्ठ रुढी आणि पद्धती यांना आळा
६. उच्चशिक्षण व्यवस्थेतील नफाखोरी आणि अपव्यवहारांना आळा
७. सामाजिक आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn