Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्र आणि भारत यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ! - शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे

श्री. बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतांना श्री. कौस्तुभ कस्तुरे
      ठाणे, २० डिसेंबर (वार्ता.)- आज दूरचित्रवाहिनींचा दुरुपयोग केला जात आहे; पण त्यांचा उपयोग स्वराज्याच्या स्थापनेसाठी का केला जात नाही ? आज देशात अनेक समस्या आहेत. त्या मला माझ्या वाटल्या पाहिजेत. समस्या दूर करणे, हे माझे कर्तव्य आहे, याची जाणीव आपल्याला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मार्गदर्शन शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. ते वेदांत खुला रंगमंच, दोस्ती विहारजवळ, वर्तकनगर येथे अश्‍वमेध प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या प्रकट जाहीर मुलाखतीच्या वेळी केले. तरुण पिढीला शिवचरित्र कळावे, यासाठी अश्‍वमेध प्रतिष्ठान आणि भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. मयुरेश जोशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्री. बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत श्री. कौस्तुभ कस्तुरे यांनी घेतली. कार्यक्रमाचा आरंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने करण्यात आली.       श्री. बाबासाहेब पुरंदरे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसे जोडण्याची कामे केली. त्यांच्या हेरखात्यात अनेक जातीतील लोक होते; पण त्यांनी कधीच त्यांना जातीवरून हाक मारली नाही. उलट त्यांचा आदरच केला. औरंगजेबाच्या तावडीत सापडलेल्या दोन मावळ्यांना सोडवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. इतिहासाचा अभ्यास बारकाईने केल्यासच आपण तो जीवनात उतरवू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून जीवन जगण्याची जिद्द निर्माण होते.
क्षणचित्रे
  • श्री. बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वागत तुतारी वाजवून करण्यात आले.
  • शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने शिवकालीन शस्त्रांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
  • श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना पोचण्यास १ मिनीट विलंब झाला, तरीही त्यांनी सर्वांची क्षमा मागितली. (नम्र व्यक्तीमत्त्वाचे श्री. बाबासाहेब पुरंदरे म्हणूनच सर्व शिवप्रेमींना आदरणीय आहेत ! - संपादक)
  • कार्यक्रमाची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने करण्यात आली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn