Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बांगलादेशातील हिंदु कुटुंबावर धर्मांधांचे आक्रमण !

       बांगलादेशातून हिंदूंचा पूर्ण वंशसंहार झाला, तरी भारत सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना काही करणार नसल्याचे ओळखून हिंदूंनी लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करून जगभरातील हिंदूंचे रक्षण करावे !
       ढाका - सध्या बांगलादेशात हिंदु कुटुंबावर आक्रमण करून त्यांची भूमी हडपण्याचे कारस्थान चालू आहे. येथे मिलिमा बेगम या महिलेने दिवंगत सुभाषचंद्र डे यांच्या घरात बराच काळ वास्तव्य करणार्‍या सौ. पारुल हलदार यांच्या घरात भाडोत्री धर्मांधांना पाठवून त्यांच्या घरातील वस्तूंची मोडतोड करून त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
       बांगलादेश मायनॉरिटी वॉच या तेथील अल्पसंख्यांकांसाठी काम करणार्‍या संघटनेचे प्रमुख श्री. रवींद्र घोष यांनी फकीरहाट पोलीस ठाण्यातील अधिकारी महंमद फझलूर रेहमान यांना संपर्क केला असता उपनिरीक्षक स्वपनकुमार सरकार यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. श्री. रवींद्र घोष यांनी स्वपनकुमार सरकार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सदर प्रकरण घडल्याचे मान्य केले आणि सौ. पारुल यांनी अद्याप कोणतीही तक्रार केली नसल्याची माहिती दिली.
       श्री. रवींद्र घोष यांनी सौ. पारुल यांना संपर्क केला, तेव्हा त्यांनी सांगितले की, १५-२० धर्मांधांनी त्यांच्या घरात घुसून त्यांचा दरवाजा, दूरदर्शन संच, तसेच इतर काही सामान यांची तोडफोड केली. त्यांची मुलगी पिंकी (वय १६ वर्षे) हिच्याकडील १ सहस्र रुपये चोरले आणि आम्हाला त्वरित घराबाहेर जाण्यास सांगितले. 
       बांगलादेश मायनॉरिटी वॉचला अल्पसंख्यांक हिंदूंच्या भूमी हडपणे, त्यांची घरे लुटून त्यांना बेघर करणे यांसारख्या हिंदूंवरील अत्याचारांसंबंधी चिंता वाटत आहे. लूटमार करणार्‍या या आक्रमणकर्त्यांना त्वरित अटक करावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी श्री. घोष यांनी केली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn