Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प्रत्येक ९६ मिनिटाला एका भारतियाचा दारूच्या अतिसेवनामुळे मृत्यू होतो !

  • हिंदु राष्ट्रात प्रत्येक जण धर्माचरण करणारे आणि साधना करणारे असल्याने त्यांना साधनेतून मिळणार्‍या आनंदामुळे कोणतेही व्यसन लागण्याची शक्यताच नसणार ! 
  • लोकांना व्यवसायापासून दूर नेण्याऐवजी त्यांना दारू पुरवणारी सरकारे लोकशाही निरर्थक ठरवतात ! 
   नवी देहली - भारतात प्रत्येक दिवशी १५ जण दारूच्या अतिसेवनामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. म्हणजेच प्रत्येक ९६ मिनिटाला एका भारतियाचा दारूच्या अति सेवनामुळे मृत्यू होत आहे, अशी माहिती ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीतून पुढे आली आहे. 
   तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी चौथ्यांदा निवडून आल्यानंतर सर्वप्रथम राज्यातील दारूची ५०० दुकाने बंद पाडली होती. बिहारमध्ये एप्रिल महिन्यात दारूबंदीचा कायदा लागू करण्यात आला. ऑगस्ट २०१४ मध्ये केरळ शासनाने पंचतारांकित हॉटेलमध्ये दारूच्या विक्रीवर नियंत्रण आणले. गुजरात आणि नागालॅण्ड या राज्यांमध्ये दारूबंदी आहे. दारूमुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या सर्वांत अधिक महाराष्ट्रात आहे. त्यानंतर मध्यप्रदेशचा क्रमांक लागतो. (दारूमुळे सर्वाधिक लोक महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये मृत्यू पावत असतांना या दोन्ही राज्यांच्या सरकारांना त्याविषयी कोणतीही संवेदनशीलता नसणे, हे लज्जास्पद आहे ! याला मृतांच्या टाळूचे लोणी खाणे म्हटले जाते ! अशी सरकारे आणणार्‍या लोकशाहीऐवजी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn