Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘कॅशलेस’च्या दिशेने राजकीय पक्षांचा प्रवास कधी ?

पंतप्रधान श्री. मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांपासून आयकर विभाग, ईडी, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा अशा विविध खात्यांनी टाकलेल्या धाडींमधून मोठ्या प्रमाणात काळे धन सापडत आहे. भारतातील सध्याची निवडणूक प्रक्रिया पाहिल्यास काळा पैसा ज्यांच्याकडे असण्याची दाट शक्यता आहे तो विभाग म्हणजे विविध राजकीय पक्ष होय ! निवडणुकीत जवळपास प्रत्येक पक्ष कोट्यवधी नव्हे, तर अब्जावधी रुपये व्यय करतो. किंबहुना काळा पैसा पांढर्‍या पैशात रूपांतरित होण्यासाठी निवडणुका हे एक महत्त्वाचे माध्यमही असते. हा निधी उद्योगपती, तसेच विविध माध्यमांकडून देणग्यांच्या रूपात राजकीय पक्षांना मिळतो. सध्याच्या व्यवस्थेत या राजकीय पक्षांना २० सहस्र रुपयांपेक्षा अल्प मिळणारा निधी हा कुठून मिळाला, हे न सांगण्याची सवलत आहे. आज सामान्य लोकांना जर अधिकोषांत काही ठराविक मर्यादेपेक्षा अधिक पैसे भरायचे असतील, तर त्यांना ते कसे उपलब्ध झाले याचा हिशोब द्यावा लागतो, तर राजकीय पक्षांना तो का द्यावा लागू नये ? राजकीय पक्षांसाठी पक्षासाठी निधी घेतांना तो अधिकोषांमार्फतच स्वीकारण्यात यावा, असा नियम का नाही ? 
राजकीय पक्षांना माहिती अधिकार का लागू नाही ?
   सध्या २० सहस्र रुपयांपेक्षा अल्प निधी कशा प्रकारे मिळाला, याचा अहवाल तर द्यावाच लागत नाही. त्याही पुढे जाऊन या निधीवर कोणताही कर द्यावा लागत नाही. याचा लाभ उठवत करचुकवेगिरी करण्यासाठी बहुतांश सर्वच राजकीय पक्ष त्यांना मिळणारा निधी २० सहस्र रुपयांपेक्षा अल्प असतो, असेच दाखवतात. ही रक्कम बहुतांश वेळा राजकीय पक्ष दाखवत असलेल्या रकमेपैकी ७५ प्रतिशतपेक्षा अधिक असते. आजपर्यंत निवडणूक आयोग नेहमी राजकीय पक्षांना सांगत असतो की, तुम्ही ‘कॅग’कडून लेखापरीक्षण करून घ्या; मात्र कोणताच राजकीय पक्ष ते कधीच ऐकत नाही. आज राजकीय पक्ष हे माहिती अधिकार नियमाच्या अंतर्गतही येत नसल्याने आज त्यांना कोणताही सामान्य माणूस पक्षाच्या झालेल्या सभा, कार्यक्रम, पत्रकार परिषद, फेरी यांवर किती व्यय झाला हे विचारू शकत नाही ! राजकीय पक्ष त्यांचे हे दायित्व कधी स्वीकारणार आहेत ? जनतेने हे किती काळ असेच चालू द्यायचे ? देश जर ‘कॅशलेस’च्या दिशेने जात आहे, तर राजकीय पक्षही ‘कॅशलेस’च्या दिशेने जाण्याचा विचार का करत नाहीत ? अशी कृती आता राजकीय पक्षांकडून होण्यासाठी जनतेनेच ही मागणी रेटून धरावी !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn